आज २७ डिसेंबर रोजी अभिनेता सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे. सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्यासोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ‘वयाच्या ५ व्या वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात मला सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली’ असे म्हणत या कलाकाराने …
Read More »या आलिशान ठिकाणी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा साखरपुडा संपन्न..
मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्रीचा म्हणजेच, हृता दुर्गुळे हिचा आज शुक्रवारी २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा संपन्न झाला आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एन्ड या ठिकाणी हृता आणि प्रतिकचा साखरपुडा संपन्न होत आहे. या खास क्षणाची हृताने खूप अगोदरच तिच्या चाहत्यांना कल्पना दिली होती. मेहंदीचे सजवलेला एक रील तिने …
Read More »संस्कृतीचा ठेवा घेऊन वादंग माजवणारे लोक याबद्दल काहीच भूमिका घेत नाही.. मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा रिऍलिटी शो प्रसारित केला जात आहे. या रिऍलिटी शोमध्ये महागुरू सचिन पिळगांवकर आणि गायिका वैशाली सामंत हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बाल कलाकार अवनी जोशी या शोचे सूत्रसंचालन करत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमधील स्पर्धकाला १०, …
Read More »सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेली पण परिस्थितीमुळे एसटी स्टँडवर गाणारी गायिका
सांज ये गोकुळी.. हे वजीर चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील सुमधुर गाणं. हे गाणं हुबेहूब गाऊन सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मंगलताई जावळे यांची मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी नुकतीच भेट घेतली आहे. मंगलताई जावळे कुठं राहतात याचा शोध घेऊन महेश टिळेकर त्यांच्या घरी जातात. मंगलताई जावळे या एसटी स्टँडवर गाणं …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्री झाली विवाहबद्ध.. या अभिनेत्यासोबत बांधली गाठ
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील मानसी कानिटकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता फडके काल रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेता सारंग दोशी ह्याच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. अमृता फडके ही मूळची पुण्याची, पुणे युनिव्हर्सिटीमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अमृताने अनेक नाटकांतून काम केले आहे. यातूनच तिला मालिकेत झळकण्याची …
Read More »अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक
‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोतुनच अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पाराज कसा असेल याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली नाही हीच या चित्रपटाची …
Read More »मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांच्या मुलाचा थाटात पार पडला विवाहसोहळा..
मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी काल शुक्रवारी १७ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबद्ध झाला आहे. अभिषेक गुणाजी त्याची खास मैत्रीण राधा पाटील हिच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल गाव येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विवाहबद्ध झाला आहे. हे ठिकाण निवडण्यामागचं काही खास खरं आहे. मिलिंद …
Read More »१७ वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ईच्छा होतेय पूर्ण …
सर्वांचा लाडका लक्ष्या म्हणजेच अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज १६ डिसेंबर रोजी १७ वा स्मृतिदिन आहे. लहानपणी रंगभूमीवर काम करणारे लक्ष्मीकांत बेर्डे टूर टूर या नाटकामुळे लोकप्रिय झाले आणि चित्रपटात मुख्य नायक बनून ते प्रेक्षकांसमोर आले. लेक चालली सासरला हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. धूम धडाका, धडाकेबाज, अशी …
Read More »कुशल बद्रिके आणि सूनयनाच्या लग्नाची गोष्ट…
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेला पांडू हा चित्रपट महाराष्ट्रभर तुफान लोकप्रिय होत आहे. या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड देखील लावलेले पाहायला मिळतायेत. कुशल बद्रिके याला चला हवा येऊ द्या ह्या शोमधून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर त्याने अनेकदा त्याच्या पत्नीचा उल्लेख केला आहे. …
Read More »“सही” म्हणजे केदार, भरत आणि अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब
केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची कॉलेजमधील नाटकांमधून मैत्री झाली. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. सही रे सही, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांतून भरतच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. पुढे लक्ष्मी चित्रपटात अंकुश आणि भरत यांची केमिस्ट्री या प्रेक्षकांना पुन्हा …
Read More »