Breaking News
Home / जरा हटके / १७ वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ईच्छा होतेय पूर्ण …
laxmikant berde prreeya swanandi abhinay
laxmikant berde prreeya swanandi abhinay

१७ वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ईच्छा होतेय पूर्ण …

सर्वांचा लाडका लक्ष्या म्हणजेच अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज १६ डिसेंबर रोजी १७ वा स्मृतिदिन आहे. लहानपणी रंगभूमीवर काम करणारे लक्ष्मीकांत बेर्डे टूर टूर या नाटकामुळे लोकप्रिय झाले आणि चित्रपटात मुख्य नायक बनून ते प्रेक्षकांसमोर आले. लेक चालली सासरला हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. धूम धडाका, धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, हमाल दे धमाल, बाळाचे बाप ब्रह्मचारी, मैने प्यार किया, साजन, बेटा, हम आपके है कौन असे अनेक मराठी हिंदी चित्रपट त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने गाजवले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे वेळप्रसंगी त्यांनी अनेक कलाकारांना आर्थिक साहाय्य देखील केलं होतं.

laxmikant berde prreeya swanandi abhinay
laxmikant berde prreeya swanandi abhinay

ग्रामीण भागातील तळागाळातील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र त्यांच्या निधनाने त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न अधुरच राहिलं होतं. आज सतरा वर्षांच्या काळानंतर त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांचं कुटुंब पूर्ण करताना दिसत आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनी त्यांची पत्नी  प्रिया बेर्डे आणि मुलं स्वानंदी व अभिनय बेर्डे या दिघांनी एक घोषणा केली आहे. कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी “लक्ष्य कला मंच” या संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. मुळात ही संस्था उभारण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की यातून कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. गावागावातील कित्येक कलाकारांना घडविण्याचे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेतून केले जाईल असे आश्वासन प्रिया बेर्डे यांनी दिलं आहे.

lakshya kala manch
lakshya kala manch

याबाबत प्रिया बेर्डे असेही म्हणाल्या की, लक्ष्मीकांत बेर्डे यांची अशी ईच्छा होती की आपणही असा एक मंच उभारायला हवा ज्यातून नवख्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांना निश्चित व योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यांना अशी संस्था उभारण्याचा मानस होता. महाराष्ट्रातील सगळ्या कलाकारांना माझं नम्र आवाहन आहे की, तुम्ही सगळ्यांनी आमच्या ‘लक्ष्य कला मंच’ मध्ये सामील व्हा​, असे आवाहन प्रिया बेर्डे यांनी सर्व कलाकारांना केलं आहे. रसिक प्रेक्षकांनी, सिनेसृष्टीतील कलाकारांनी भरभरून दिलेले प्रेम, आपुलकी अशीच कायम राहो हि अपेक्षा. दरम्यान नवख्या कलाकारांना आणखी एक व्यासपीठ उपलब्ध करू दिल्याबद्दल कलाकारांनी बेर्डे कुटुंबियांचं अभिनंद केलं आहे.

abhinay berde swanandi berde
abhinay berde swanandi berde

प्रिया बेर्डे या लक्ष्य कला मंच संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून जबादारी सांभाळत असल्या तरी ह्या संस्थेच्या कार्यात स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बर्डे यांची साथ त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप खास आहे असे मत स्वानंदीने सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. लक्ष्य कला मंच या त्यांच्या संस्थेला भरभरून यश मिळो ही सदिच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.