एमसी स्टॅन हा हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या सिजनचा विजेता ठरला. मात्र शिव ठाकरे, सुमबुल खान, शालीन भनोट, टिना दत्ता यांच्यामुळे हा शो खऱ्या अर्थाने खूप गाजला. सुमबुल, शालीन आणि टिना या प्रेमाच्या त्रिकोनामुळे त्यांच्या घरच्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागला होता. अगदी त्यांचे पालक शोमध्ये येऊन गहन चर्चा करू लागले. यात महत्वाचं म्हणजे सुमबुलच्या वडिलांनी एकदा नव्हे तर तीन वेळेस येऊन तिला समजावण्याचा आणि बिगबॉस शोचा टीआरपी वाढवण्याचे काम केले. त्यावेळी सुमबुलचे वडील तौकिर खान चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले.

आता हेच सुमबुलचे वडील तौकीर हसन खान लवकरच दुसरे लग्न करणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुमबुलनेच स्वतः ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या ती तिचे वडील आणि बहीण सानियासोबत राहते आणि त्यांच्या सावत्र बहिणीचेही स्वागत करण्यास ती सज्ज झालेली आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा आनंद व्यक्त करताना सुंबुलने एक मुलाखत दिली. आपल्या वडिलांनी घेतलेल्या या निर्णयावर सुमबुलने सांगितले की, आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्यांचे आमच्या कुटुंबात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आमच्या या नवीन आईसोबत एक नवीन बहीणही आमच्या सुखी कुटुंबात सामील होणार आहे. या सर्वांसाठी आम्ही खूपच उत्साहित आहोत.
माझे वडील गेल्या अनेक वर्षांपासून माझे प्रेरणा आणि समर्थनाचे सर्वात मोठे स्त्रोत बनलेले आहेत. आजवर त्यांनी मला करिअर साठी खूप सपोर्ट केला आहे. हिंदी मालिका ते बिगबॉस हा प्रवास माझ्यासाठी खूपच सुंदर होता. सानिया आणि मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहोत. दरम्यान सुमबुलच्या वडिलांच्या होणाऱ्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने एकच चर्चा पाहायला मिळत आहे. सुमबुल बिग बॉसच्या घरात असताना चुकीचे पाऊल उचलत होती. त्यावेळी वडिलांनी बिगबॉसच्या घरात येऊन तिला प्रत्यक्ष समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. वेळोवेळी कानउघाडणी देखील केली. सलमान खान आणि इतर सदस्यांनी देखील तिला समजावले होते. मात्र आता तौकिर खान स्वतःच या वयात दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढत असल्याने नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.