विकास आणि मीराचा स्पेशल डान्स असो वा किचनमधील सुगरण मीरा, प्रेक्षकांनी आतापर्यंत तिचे भरभरून कौतुक केले आहे. चाहत्यांनी दिलेल्या आजवरच्या प्रतिसादाने ती सेफ होत आली आहे. बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर दादूसने मीराबद्दल दिलेली प्रतिक्रिया खुपच समर्पक होती. मनमिळाऊ मीरा आणि दादूस यांच्यातील त्या नात्याची व्याख्या करता येणार नाही. महेश मांजरेकर यांनी चावडीवर वेळोवेळी परखड मत देखील व्यक्त केले परंतु आताच्या सुरु असलेल्या उलट सुलट चर्चेमुळे प्रेक्षकांमध्ये घरातील सदस्यांबद्दल नाराजी दिसत आहे.
मीराच्या हाताला लागलं होतं, तिने याचा इश्यू केला नाही. ते बहुतेक तिचं चुकलंच कारण उत्कर्ष तिचा हात दाबून देत होता. ह्या एकाच विडिओचं आता भांडवल केलं जातं आहे. ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित? मैत्री काय असते ही व्याख्याच मुळात यांना माहित नसावी. यावर प्रेक्षकांना काय वाटतं असा सणसणीत सवाल मीरा करीत आहे. विकासच होता जो सोनालीसाठी मागच्या आठवड्यात पाठीशी उभा राहिला होता. आज तोच विकास सोनाली बरोबर मीरा आणि उत्कर्षच्या मैत्रीच्या नात्यावर वर शंका घेतो, हे कितपत बरोबर आहे. विकास आणि सोनाली मधील चर्चेत मीऊ मीऊ अशी हिंट तो देतो पण सोनाली समजले नसल्याचे दाखवते. यावरून विकास माइंड गेम खेळतोय हे प्रेक्षकांना जाणवलं आहे. या अगोदरही कॅप्टन्सी पासून विलिप्त असलेला विकास भलताच एक्टीव्ह झालेला पाहायला मिळाला. विशाल असो कि जय यांच्यामध्ये आता विकास थोडासा वरचढ ठरेल असं चित्र तयार होत आहे. मीराची ही जमेची बाजू प्रेक्षकांसमोर मांडल्याबद्दल तिच्या चाहत्यांनी आभार मानले आहेत.
खेळाच्या शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं हे उत्तम खेळाडूचा स्वभाव गुण असतो, दरवेळी १०० टक्के देऊन मीरा नेहमीच टास्क खेळली. बिग बॉसच्या घरात मीराचा भाऊ भेटण्यासाठी आला तेव्हा त्याने बहिणीची पाठराखण केली होती. ज्या तत्परतेने मीराने भावाला तीचा स्ट्रगल असो सक्सेस किंवा लाईफ जर्नी सांगण्यापासून रोकलं होतं, तो क्षण प्रेक्षकांची मने जिंकणारा ठरला. मीराला सहानुभूतीचा खेळ खेळायला कधीचं आवडत नाही आणि हे तिच्या बोलण्यातून लाईव्ह पाहायला मिळत आहे, हे प्रकर्षाने त्याने बोलून दाखवले होते. याशिवाय उत्कर्षची बायको स्वप्नजा घरात भेटायला आली तेव्हा, मीराने उत्कर्षला किचनमधील गोष्टी शिकवल्या याबद्दल तिने मनापासून कौतुक केले होते हे विशेष. बिग बॉसच्या घरातील कुजबुजीला बाजूला सारून मीरने आवाहन केले आहे की, काही नाती रक्ताची नसली तरीही आपल्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. जिव्हाळा आपलेपणा आणि प्रेमाचे हे बंध कठीण काळात न मागता देखील भक्कम आधार ठरतात. अगदी जसे तुम्ही आपल्या वोटिंग मार्फत प्रेम आणि आधार देत आहात, असंच प्रेम आणि वोटिंग करत रहा.