बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदासाठी टास्क खेळण्यात आला मात्र पहिला टास्क कोणताच गट जिंकू न शकल्याने बिग बॉसने दुसरा टास्क दिला. दरम्यान सोनाली आणि मीरामध्ये चांगलीच धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली त्यावेळी सोनाली मला धक्काबुक्की करते असे मिराने ओरडून बिग बॉसला सूचित केले. या टास्क दरम्यान घरातील काही सदस्य कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले परिणामी या कार्यात आडकाठी आणणाऱ्या दोषी सदस्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल असा ठाम निर्णय बिग बॉसने घेतला आहे.
हे सदस्य कोणकोणते असतील हे लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान टास्क खेळत असताना गायत्रीला मात्र दुखापत झालेली असते. गायत्रीच्या हाताला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील किमान तीन आठवडे तरी स्लिंग घालण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गायत्री कुठल्याच टास्कमध्ये सहभागी होऊ शकणार नाही असे सूचित केले आहे. त्यावर गायत्रीने एक प्रश्न बिग बॉसला विचारला की, मी टास्क खेळत असताना स्लिंग काढून खेळू शकते का?…तिच्या या प्रश्नावर बिग बॉसने उत्तर दिले की, गायत्री आता तरी डॉक्टरांनी आपल्याला टास्क खेळण्यापासून मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे. बिग बॉसच्या या प्रतिक्रियेवर गायत्रीची निराशा झाली असल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते. दुखापत होऊनही आपल्याला टास्क खेळायचाय आणि जिंकून घरात टिकून राहायचं हाच यामागचा उद्देश असल्याने गायत्रीने बिग बॉसला टास्क खेळू देण्यासाठी विनंती केली होती. तिकडे टास्क खेळत असताना अनेक वाद विवाद होऊ लागले. जय आणि विकास यांच्यात मोठी बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.
त्यावेळी विकास जयला म्हणतो की, मी दीड शहाणा नाही दोन शहाणा आहे एवढं बोलल्यावर मात्र जय आणखीनच आरडाओरडा करू लागतो हे पाहून विकास ‘जयला एवढंच करता येतं’ असं ठणकावून सांगतो. त्यानंतरही हा टास्क पूर्णत्वास येत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. शेवटी बिग बॉसने दिलेला टास्क मात्र अनिर्णित झाला असल्याने ज्या ज्या सदस्यांनी हा टास्क खेळताना आडकाठी आणली आहे त्या सर्व सदस्यांना जेलमध्ये टाकले जाईल असे म्हटले आहे. आजच्या भागात बिग बॉसच्या मते हे दोषी सदस्य कोणकोण असणार आहेत ते पाहायला मिळेल. मात्र दुखापत झाल्याने इथून पुढे काही दिवस तरी गायत्री कुठल्या टास्कमध्ये खेळू शकणार नाही असा सल्ला बिग बॉसने तिला दिला आहे. तरीदेखील मी पूर्ण काळजी घेऊन बिग बॉसने दिलेल्या कार्यात सहभागी होण्याचा १०० टक्के प्रयत्न करेन असा विश्वास गायत्रीला वाटतो आहे.