काल कलर्स मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रेड कार्पेटवर कलर्स मराठीवरील मालिकेतील कलाकारांसोबत मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनच्या सदस्यांनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्या मैत्रीच्या नात्यामुळे चांगलेच चर्चेत राहिले होते. स्नेहा वाघने आविष्कार दारव्हेकर सोबत संसार थाटला होता. मात्र घरगुती हिंसाचार प्रकरणी तिने आविष्कार पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्नेहाने अनुराग सोळंकी सोबत दुसऱ्यांदा संसार थाटला मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे नाते देखील संपुष्टात आले. असे असले तरी स्नेहाने आपण अजूनही सिंगल का आहोत याचे उत्तर सोशल मीडियावर दिलेले पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्रामवर एक रील बनवून स्नेहा वाघने तो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इन्स्टग्रामनेच स्नेहा वाघ अजून सिंगल का आहे याचे खरे उत्तर दिले आहे. ‘Already in a toxic relationship with Netflix’ असे उत्तर मिळाल्यावर इन्स्टग्राम मला चांगलाच ओळखतो असे ती गमतीशीर म्हणताना दिसत आहे. स्नेहा वाघने काटा रुते कुणाला, अधुरी एक कहाणी या मराठी मालिकेत काम केल्यानंतर तिची पाऊले हिंदी मालिका सृष्टीकडे वळली. एक वीर की आरदास, चंद्रशेखर, ज्योती, मेरे साईं, चंद्रगुप्त मौर्य अशा हिंदी मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. मराठी बिग बॉसमधून तिने मराठी सृष्टीत पुनरागमन केले. मात्र अजूनही ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे असे ती या रीलमध्ये सुचवताना दिसत आहे.

नेटफ्लिक्स सारख्या माध्यमातून स्नेहाला प्रसिद्धी मिळावी अशी तीची मनापासून ईच्छा आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम मला खूप चांगला ओळखतो असे ती या रील मध्ये म्हणताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने वेबसिरीजच्या माध्यमातून अनेक कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे मलाही अशी संधी मिळावी अशी अपेक्षा तिने केली आहे. बिग बॉसच्या शो नंतर स्नेहा वाघला चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना होती. मध्यंतरी तिच्याकडे चांगला प्रोजेक्ट आला असल्याचे मीडिया माध्यमातून वर्तवले होते मात्र सध्या तरी ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये व्यस्त नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इन्स्टग्रामने तिच्याबाबत वर्तवलेली अपेक्षा लवकरच पूर्ण होवो हीच सदिच्छा.