Breaking News
Home / बॉलिवूड / भूतनाथ सिनेमा मधील बाल कलाकार आठवतो का? आत्ता दिसतो असा! फोटो होतायेत व्हायरल…
aman siddiqui
aman siddiqui

भूतनाथ सिनेमा मधील बाल कलाकार आठवतो का? आत्ता दिसतो असा! फोटो होतायेत व्हायरल…

सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून काम करतात, ते सध्या काय करतात हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे करोडो चाहते; त्यांचा ‘भूतनाथ’ (Bhootnath) हा सिनेमा तुमच्या आठवणीत असेलच ना? या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन सोबत एका लहान मुलाने प्रमुख भूमिका साकारली होती.

aman siddiqui
aman siddiqui

भूतनाथ हा चित्रपट बच्चे कंपनीचे मनोरंजन करणारा तसेच थोडासा हॉरर होता. हा चित्रपट मोठ्यांनाही आवडेल अशाच पद्धतीने दिग्दर्शित केला गेला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जुही चावला (Juhi Chawla), शाहरुख खान (Shahrukh Khan) या दिग्गज कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यात एका बालकलाकाराची भूमिका होती जी प्रेक्षकांना खूप आवडली, त्याच्या या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली.

भूतनाथ या चित्रपटात बालकलाकार म्हणून बंकूची भूमिका अमन सिद्दीकी याने साकारली होती. अमन सिद्दीकी आणि अमिताभ बच्चन यांच्या मध्ये भूतनाथ या सिनेमात एक चांगली केमिस्ट्री होती. या दोघांच्याही भूमिका उत्कृष्ट होत्या. जे लोक अजूनही विसरू शकत नाहीत.
लहान मुलांचा विचार करूनच हा सिनेमा बनवला होता. लहान मुलाचा आवडीचा विषय असल्याने हा सिनेमा लहानग्यांसाठी खूप रंजक ठरला. जी मुलं त्याकाळी कार्टून लव्हर होते त्यांनी सुद्धा हा सिनेमा अत्यंत आवडीने पाहिला. 

aman siddiqui young
aman siddiqui young

अमन सिद्दीकी या चित्रपटानंतर फारसा कोणत्या सिनेमात पहायला मिळाला नाही. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याला बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स आल्या, परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याने कोणत्याच ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. त्याने काही टीव्ही जाहिरातीमध्ये देखील काम केले होते. अमन हा पहिल्यापासूनच एक उत्तम अभिनेता आहे. अभिनय क्षेत्रापासून लांब राहूनही त्याचे आणि अमिताभ यांचे नाते आजही चांगले आहे. वेळ मिळेल तेव्हा त्यांची आवर्जून भेट घेत असतो. लहान असताना जितका छान आणि सुंदर होता तितकाच सध्या तो स्मार्ट दिसतो. 
त्याच्या सध्याच्या लूकने त्याला कोणीही ओळखणार नाही. अमिताभ बच्चन यांच्याकडून तो आजही अभिनयाचे धडे घेण्यासाठी आणि भेटण्यासाठी नेहमी जातो. बंकूची भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या अमन सिद्दीकी याला त्याच्या जीवनात असेच यश मिळत राहो. त्याला पावलोपावली संधी मिळू दे. अमनला त्याच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा…! 

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.