लहान मुलांचा आनंद द्विगुणित करणारा हक्काचा दिवस म्हणजे बालदीन. बिग बॉस मराठी सिझन ३ मधील स्पर्धकांनी आता पर्यंत विविध टास्क करीत तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बालदिना निमित्त लहानपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत सर्वांनी चाहत्यांसोबत बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या निमित्ताने बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धक आणि महेश मांजरेकर बाल कलाकारांच्या सोबत धम्माल मस्ती करणार आहेत.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात बऱ्याच रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन्सी निवडण्यावरून स्पर्धकांना आपल्या आवडत्या गोष्टींना मुकावे लागले होते. मैत्रीचं पारडं नेहेमीच भारी असतं हे सिद्ध करीत विशाल आणि विकास यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तर अपात्रतेचा बोर्ड घातल्यामुळे सोनालीने रडारड केली, मीराला तिचा सॉफ्ट टॉय आणि घरचे फोटो गमवावे लागले. बिग बॉसच्या चावडी मध्ये महेश मांजरेकर यांची शाबासकी तसेच सणसणीत छडी देखील पाहायला मिळाली. महेश यांनी स्नेहाला खडसावीत प्रेक्षकांनी पहिले आहे कोणी कोणाला ढककले अशी कान उघडणी केली, तर गायत्रीला या आठवड्याची माचीस संबोधून चांगलेच खडसावले देखील. महेश सरांनी मीरा आणि स्नेहाची चांगलीच शाळा घेतली, सोनाली आणि गायत्रीच्या आवाजाचा कौतुक वजा टोमणा खूपच मजेशीर होता. दादूस, निथा, मीनल यांना प्रेक्षकांची खास मिळत नसली तरीही एलिमिनेश पासून ते खूप दूर पहायला मिळाले आहेत. तर विशाल सोबत राहून सोनालीची लोकप्रियता वाढत आहे, ह्यावरून विशाल दमदार खेळत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच टीम बी मधून स्पर्धक बाद होईल अशा चर्चेला प्रेक्षकांमध्ये उधाण आले आहे.
सोशल मीडियावर सर्व स्पर्धकांनी त्यांचे लहानपणीचे फोटो अपलोड करून चाहत्यांना खुश केले आहे. त्यांचे हे फोटो पाहून खूप छान छान कमेंट चाहत्यांनी दिल्या आहेत. बालदिना निमित्त बिग बॉस मराठी मधील स्पर्धकांना भेटायला दोन बाल कलाकार येणार असून, प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. स्पर्धकांच्या काही गोड खट्याळ फोटोंवरील गप्पा धमाल मस्ती करीत या मुलांच्यासोबत त्यांच्या वयाचे होऊन सर्व स्पर्धक धिंगाणा घालणार आहेत.