चला हवा येऊ द्या या शोची आता हिंदी चित्रपट सृष्टीला देखील भुरळ पडली आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून रोहित शेट्टी, अक्षय कुमार नेहमीच कलाकारांसोबत हजेरी लावताना दिसतात. चला हवा येऊ द्या या शोचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हे बॉलिवूड मंडळी प्रयत्न करत असतात. अशातच ह्या आठवड्याच्या विशेष भागात अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर उपस्थिती लावली आहे. सोमवार आणि मंगळवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी रंगणार आहे. त्यामुळे अक्षय सोबत धमाल मस्ती करताना ही मंडळी दिसणार आहेत.

अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी सुरुवातीलाच चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स केलेला पाहायला मिळणार, शिवाय अक्षय कुमार मराठीतूनही संवाद साधताना दिसणार आहे. त्यामुळे हा एपिसोड प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारने श्रेया बुगडे सोबत धमाल मस्ती केली आहे. यात त्याने श्रेयाला गिफ्टम्हणून एक मोबाईल देताना दिसतो. श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या या शोसोबतच किचन कल्लाकार या शोचे सूत्रसंचालन करताना दिसते. किचन कल्लाकारच्या मंचावरून घेतलेले सेल्फी आणि फोटोज ती तिच्या सोशल अकाउंटवर अपलोड करताना दिसते. मात्र श्रेयाने आजपर्यंत म्हणजे गेल्या ८ वर्षांपासून ज्या शोचा अविभाज्य घटक बनली आहे त्या चला हवा येऊ द्या च्या मंचावर कधीच फोटो काढत नाही.

असा आरोप अक्षयने श्रेयावर लावला त्याला निलेश साबळेने देखील साथ दिलेली पाहायला मिळाली. याच कारणामुळे अक्षयने श्रेयाला मोबाईल गिफ्ट केला जेणेकरून ती चला हवा येऊ द्या च्या मंचावर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करू शकेल. परंतु या आरोपांवर श्रेया म्हणते की मी नेहमीच चला हवा येऊ द्या च्या मंचावरून फोटो काढत असते. अर्थात हा सगळा गमतीचाच एक भाग असल्याने निलेश सबळेने श्रेयाला एक कोपरखळीच मारलेली पाहायला मिळत आहे फक्त त्याने अक्षय कुमारला पुढे केले एवढंच. चला हवा येऊ द्या मध्ये अक्षय कुमार आणि क्रिती सेनन यांनी चमचा लिंबूचा खेळ खेळला. या खेळात अक्षय कुमार चलाखी करून सगळ्यांना धक्के देत पुढे जाताना दिसतो.
मजेशीर बाब म्हणजे अक्षय कुमार यावेळी फक्त चमचावर असलेला लिंबू काढून घेतो हे कॅमेऱ्यामन शिवाय कोणालाच समजत नाही. ही धमाल मस्ती अनुभवण्यासाठी सोमवार आणि मंगळवरचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. कारण याअगोदर देखील अक्षय कुमारने चला हवा येऊ द्या शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांना हसवलं आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी बच्चन पांडे हा सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावे असेही आवाहन केले आहे.