Breaking News
Home / मराठी तडका / या कारणामुळे अशोक सराफ यांनी निवेदितासोबत मंदिरात जाऊन केले होते लग्न..
superstar ashok saraf with nivedita saraf
superstar ashok saraf with nivedita saraf

या कारणामुळे अशोक सराफ यांनी निवेदितासोबत मंदिरात जाऊन केले होते लग्न..

आज ४ जून जेष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा ७४ वा वाढदिवस. आज या वाढदिवसानिमित्त अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्या लग्नाचा आगळा वेगळा किस्सा जाणून घेऊयात…अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर करायचे. ययाती आणि देवयानी हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी साकारलं यात त्यांनी साकारलेली विदूषकाची भूमिका तुफान लोकप्रिय ठरली. अशाप्रकारे या अष्टपैलू कलाकाराचे अभिनय क्षेत्रात आगमन झाले.

अशोक सराफ आणि निवेदीता जोशी यांच्यात नेमके सुर कुठे जुळले याबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. ज्यावेळी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात हे दोघे एकत्रित काम करत होते त्यावेळी निवेदिता जोशी अशोक सराफ यांच्या अभिनयावर खूपच भाळल्या होत्या. तेव्हापासून निवेदिता यांना अशोक सराफ आवडू लागले होते. शेवटी घरच्यांचा विरोध डावलून स्वतः निवेदितानेच अशोक सराफ यांना लग्नाची मागणी घातली होती. निवेदिता जोशी यांचे वडील गजन जोशी हे देखील मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते परंतु आपल्या लेकीने कलाकारासोबत लग्न करू नये असा त्यांच्या आईचा अट्टाहास होता.

ashok saraf and nivedita ashok saraf
ashok saraf and nivedita ashok saraf

निवेदिता यांची थोरली बहीण डॉ मीनल परांजपे हिच्या पुढाकाराने शेवटी या लग्नाला घरच्यांकडून परवानगी मिळाली. मुंबईत थाटामाटात लग्न करता येत असूनही अशोक सराफ आणि निवेदिता यांनी आपले लग्न गोव्यातील मंगेशी मंदिरात अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. याला दोन कारणं होती. एक म्हणजे मंगेशी हे अशोक सराफ यांचे कुलदैवत आणि दुसरं म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता यांनी याच मंदिरात प्रेमाच्या आणाभाका गिरवल्या होत्या. त्यामुळे बहिणीच्या पुढाकाराने आणि कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांनी अगदी साधेपणाने लग्न केले. जेव्हा त्यांच्या लग्नाची ही बातमी सगळीकडे समजली त्यावेळी त्यांचे हे लग्न खूपच चर्चेत आले होते. लग्नानंतर मात्र निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. आपला एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने स्वीकारली. त्याचकाळात अशोक सराफ अभिनयाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले होते. आज त्यांचा ७४ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या अनेक प्रियजनांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आमच्या टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या आणि सुदृढ आयुष्याच्या kalakar.info टीम तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!!!

family of ashok and nivedita saraf
family of ashok and nivedita saraf

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.