बहुचर्चित पण तितकाच वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १७ मध्ये दररोज रंजक घडामोडी घडत आहेत. नवीन एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड मारामारी झालेली पाहायला मिळणार आहे. आगामी एपिसोडचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात अंकिता लोखंडे, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि इतर स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झालेली दाखवण्यात आली आहे. त्यातील टास्कमध्ये अंकिता लोखंडे हिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याअगोदर स्पर्धकांमध्ये अनेक वेळा वाद झालेले पाहायला मिळाले.
या आठवड्यात अंकिता लोखंडे, अनुराग डोभल, ऐश्वर्या शर्मा, निल भट यांना नॉमीनेट करण्यात आले आहे. दरवेळी अंकिता लोखंडे नॉमीनेशनच्या प्रक्रियेत वाचलेली पाहायला मिळाली. अनेकदा ती या शोमध्ये सिम्पथी मिळवण्याचा प्रयत्न करत असते असे बोलले जाते. स्ट्रगल काळ असो किंवा सुशांत सोबतच्या जुन्या आठवणींना ती अनेकदा उजाळा देत असते. यावरून अंकिताला अनेकदा ट्रोलही करण्यात आले. मात्र आता प्रथमच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने अंकिताला चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळत आहे. आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने अंकीताच्या खेळीवर नाराजी दर्शवली आहे. ती म्हणते की, अंकिता ही पहिल्या दिवसापासूनच मी किती स्ट्रॉंग आहे हे म्हणत आली आहे.
पण तू प्रत्येक आठवड्यातच नॉमीनेशन प्रक्रियेच्या अगोदर किंवा नंतर सुशांत सिंग राजपुतचं नाव का घेतेस? तू त्याच्या नावाचा वापर करून हा खेळ का खेळत असतेस. असे करून तू सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस. तू म्हणतेस मी खूप स्ट्रॉंग आहे, तर त्या पद्धतीने तू खेळ आणि स्वतःला सिद्ध करून दाखव. तुला जर मतं मिळवायची आहेत तर भूतकाळात घडलेल्या गोष्टी सांगण्याची तुला काहीच गरज नाही. या गोष्टी अशा रिऍलिटी शोमध्ये करू नकोस. असे म्हणत रुपालीने अंकिताला एक सल्ला देऊ केला आहे. प्रत्येकवेळी सुशांतचे नाव वापरून लोकांकडून तू सहानुभूती नाही मिळवू शकत त्यासाठी तुला स्ट्रॉंग आहेस हे दाखवावं लागेल हे मत रुपालीने तिच्याबाबतीत दिलं आहे.