ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या बहुरंगी अभिनययाचेही रसिकांनी भरभरून कौतुक केलेआहे, सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या या दोघांची ओळख झाली, नाटकाच्या सरावा दरम्यान त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले होते मात्र नाटकाचे प्रयोग संपत आले तरीही या दोघांनी एकमेकांना कधीच प्रेमाची कबुली दिलेली नव्हती.
![aishwarya son amey narkar with trushala](https://kalakar.info/wp-content/uploads/2021/05/aishwarya-son-amey-narkar-300x230.jpg)
नाटकाचे सर्व प्रयोग आता संपत येणार होते आणि शेवटी पुन्हा कधीच भेट होणार नाही अशा विचाराने ऐश्वर्या नारकर यांनी पुढाकार घेत नाटकाच्या अगदी शेवटच्या प्रयोगाच्या दौरा सुरु असताना आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी थाटामाटात लग्न केले. नाटक, चित्रपट यासोबतच अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून या दोघांनी एकत्रित काम केले आहे. या दोघांना एक मुलगाही आहे त्याचे नाव “अमेय नारकर” असे आहे. अमेय हा मराठी सृष्टीत फारसा चर्चित नसला तरी नृत्याची त्याला विशेष आवड आहे. दिसायला अतिशय देखणा असून अमेय भविष्यात कलाक्षेत्रात आल्यास आई वडिलांप्रमाणे चांगले नाव कमवेल असे म्हणायला वावगे ठरायला नको. अमेय नारकरला सुंदर गर्लफ्रेंड देखील आहे. आज याच कारणामुळे अमेय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ‘तृशाला नायक’ असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव असून मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स ही पदवी तिने प्राप्त केली आहे. अमेय आणि तृशाला हे दोघे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत. अनेकदा नारकर कुटुंबासोबतचे तृशालाचे फोटो चर्चेत येत आहेत. नारकर कुटुंबातही ती अगदीच छान रुळली असून त्यांच्या एकत्रित फोटोमुळे ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून तृशाला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.