Breaking News
kedar bela shinde marriage
kedar bela shinde marriage
Home / जरा हटके / केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…

केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…

श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक नाटक आणि मालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळाले.

kedar shinde old marriage photos
kedar shinde old marriage photos

केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. पत्नी बेला सोबत पुन्हा एकदा लग्न करण्याचेही यावेळी एक खास कारण आहे. बेला आणि केदारने २५ वर्षांपूर्वी ९ मे रोजी कोर्टमॅरेज केले होते. यावेळी कुठलाच मुहूर्त त्यांनी पाहिला नव्हता ना हळद ..ना कुठले साग्रसंगीत त्यांना पाहायला मिळाले नव्हते. लग्नामध्ये कुठलीच हौस करता आली नाही याच कारणास्तव त्यांना हा सर्व अनुभव पुन्हा एकदा नव्याने घ्यायचा होता. त्यामुळे आपल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा लग्नागाठ बांधण्याचे त्यांनी ठरवले. यावेळी अनुभव न घेतलेले सर्व विधी त्यांनी साग्रसंगीत पूर्ण केले. सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांनी बेलाच्या बाजूने तिचे कन्यादान केले. या लग्नाला ऑनलाइन मित्रमंडळी आणि नातेवाईक सर्व हजर असलेली पाहायला मिळाली. केदार आणि बेला ची मुलगी सना शिंदे हिने आपल्या आई वडिलांची लग्नात राहिलेली ही ईच्छा पूर्ण केली असे ती एका पोस्टद्वारे म्हणते आहे. आई वडिलांच्या विवाहबद्दल तिने एक पोस्ट लिहून त्यांना गोड शुभेच्छाही दिल्या आहेत.

kedar shinde family
kedar shinde family

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.