अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात नुकतीच शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परवानगी न घेता बेकायदेशीररित्या कमर्शिअल प्रोजेक्टसाठी सेट वापरला म्हणून ही तक्रार एका निर्मात्याने त्याच्या विरोधात केली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात…
सरकारच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षापासून सर्वच नाटकांचे प्रयोग बंद पडले आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं नाटक सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र हे नाटक देखील सद्य परिस्थितीमुळे बंद पडलं आहे. त्यामुळे या नाटकाचा सेट तसाच पडून होता. सुरेश सावंत यांनी हा सेट श्रेयस तळपदेला त्याच्या व्यावसायिक प्रोजेक्टसाठी वापरण्यास दिला. श्रेयसने मधल्या काळात या सेटचा वापर आपला भक्षक या आगामी प्रोजेक्टसाठी वापरला. जेव्हा ही बाब समोर आली त्यावेळी ‘अद्वैत थेटर’ या संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी सुरेश सावंत यांना जाब विचारला. सेट तसाच पडून असल्याचे कारण सांगत त्यांनी हा सेट श्रेयस तळपदेला वापरण्यास दिला असल्याचे संगीतले.
आपली परवानगी न घेता अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट व्यावसायिक प्रोजेक्टसाठी वापरण्यास दिला या कारणावरुन राहुल भंडारे यांनी शिवडी पोलीस ठाण्यात सुरेश सावंत आणि श्रेयस तळपदे या दोघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने या प्रकरणाबाबत अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान श्रेयस तळपदे त्याच्या आगामी मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तो अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्यासोबत छोट्या पडद्यावर झळकणार आहे. श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी तर प्रार्थना बेहरे ही तब्बल १० वर्षांनी मालिकेकडे वळलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदे ह्याने आपल्याच मित्राने घाट केला म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत काम मिळत नाहीये असा आरोप केला होता. श्रेयस तळपदेची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमात व्हायरल झाली होती. या बातमीने त्याला आता पुन्हा एकदा मराठी सृष्टीत काम करण्याची संधी मिळाली आहे.
श्रेयस तळपदे तुमची प्रतिमा प्रेक्षकांसाठी चांगलीच राहील.व्यवसायिक व्यवहारांत लढाईच्या शिड्या पार कराव्याच लागतात. ही बाब आता सर्वसामान्य झाली आहे.कोणी बदनाम करून कोणी बदनाम होत नाही. एक ना एक दिवस चा़ंगल्या वाईटाची पारख जगाला पटतेच.