कलासृष्टीत कोणी लग्न बंधनात अडकतय तर कोणी चिमुकल्या पावलांची वाट पाहतोय. आई कुठे काय करते या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुद्धा लवकरच आपल्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. मालिकेत अंकीताची भूमिका राधा सागर हिने साकारली होती. अंकिताचे अभिसोबत लग्न जुळणार असते मात्र त्यानंतर अंकिताची या मालिकेतून एक्झिट होते. ही भूमिका राधा सागर हिने तिच्या अभिनयाने सुरेख वठवली होती. नुकतेच तिने सोशल मीडियावरून लवकरच आई होणार असल्याचे कळवले आहे. बेबी बम्पचे काही व्हिडीओ शेअर करत राधाने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळते.
![radha sagar baby shower](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/05/radha-sagar-baby-shower.jpg)
तिच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. राधा सागर हिचा नवरा सागर मुकुंद कुलकर्णी हा राजकिय क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या उपचिटणीस पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधा सागरचा जन्म २७ मार्च १९८९ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. तिने तिचे शालेय शिक्षण पुण्यातील एमआयटी स्कूलमधून पूर्ण केले. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून व्यावसायिक ललित कला शाखेत पदवीचे शिक्षण तिने पूर्ण केले. राधाला लहानपणापासूनच वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करण्याची खूप आवड होती. तिने शालेय जीवनापासूनच नाटकातून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
![radha sagar good news](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/05/radha-sagar-good-news.jpg)
पदवीनंतर अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राधा मुंबईत शिफ्ट झाली. एक मोहोर अबोल ही राधा सागरने अभिनित केलेली पहिली मालिका. सुंदरा मनामध्ये भरली, भिरकीट, कन्यादान, बेनवाड, ठाकरे, आवाज, अस्मिता, वजनदार, एक अलबेला. कंडिशन्स अप्लाय अशा चित्रपट, मालिकांमधून राधा सागरने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. सुंदरा मनामध्ये भरली याही मालिकेत राधाने विरोधी पण तेवढीच महत्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे राधा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून राधा अभिनय क्षेत्रापासून थोडीशी दूर होती. त्याचे कारण आता तिच्या चाहत्यांसमोर आले आहे. त्यामुळे राधावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.