Breaking News
Home / मराठी तडका / नाडकर्णी काकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे निधन.. आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारावर एकामागून एक दुःखाचे सावट
milind gawali madhurani prabhulkar
milind gawali madhurani prabhulkar

नाडकर्णी काकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे निधन.. आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारावर एकामागून एक दुःखाचे सावट

११ मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक आणि दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने अवघी मराठी सृष्टी हळहळली होती. नाटकांचे परीक्षण करणे आणि परखडपणे मत मांडणे यामुळे नाडकर्णी काका सर्वांच्या चांगलेच परिचयाचे झाले होते. नाटक आवडलं असेल तर त्याचे कौतुक आणि जर नाही आवडले तर त्याचे वाईट शब्दात वर्णन ते करत असत. यामुळे अनेकांना त्यांचे मत पटलेले नसायचे. या भूमिकेमुळे त्यांनी अनेक शत्रू देखील बनवले होते. मात्र त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांचे ते आवडते नाडकर्णी काका बनले होते. आई कुठे काय करते मालिकेची लेखिका नमिता वर्तक ही त्यांची मुलगी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कमलाकर नाडकर्णी आजारी होते.

milind gawali madhurani prabhulkar
milind gawali madhurani prabhulkar

त्यांची सुश्रुषा करत असताना नमिताने आई कुठे काय करते मालिकेचे एपिसोड लिहून दिले होते. जेव्हा नाडकर्णी काका निवर्तले तेव्हाही एवढे मोठे दुःख कोसळले असूनही नमिताने मालिकेचे लिखाण केले होते. मात्र काल २७ मार्च रोजी त्यांच्या आईचेही दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनानंतर नमिताच्या आई आजारी पडल्या. काल त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नमिताच्या मागे किती दुःख आहेत याची कल्पनाच करवत नाही. असे म्हणत आई कुठे काय करते मालिकेचे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक भावुक गोष्ट लिहिली आहे. याबाबत मिलिंद गवळी यांनी दिलेली कलाकारांच्या आयुष्यातील माहिती सध्या चर्चेत आली आहे. खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये.

kamlakar nadkarni namita vartak
kamlakar nadkarni namita vartak

जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत, आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं. जे कधीच नाही दिसत, आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं. सिरीयलचा २३-२४ मिनिटाचा एपिसोडसाठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात, पडद्याच्या मागे खूप काही घडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही. दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय. तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे.

मग परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो. बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो. पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल तर. लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते. त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने एपिसोड लिहून दिले. ११ मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा एपिसोड नमिताने लिहून देत होती. काल २७ मार्च रोजी म्हणजे १६ दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली. नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही, आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.