Breaking News
Home / मालिका / माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..
abhijeet khandkekar rasika anita date
abhijeet khandkekar rasika anita date

माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..

झी मराठी वाहिनीवरील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. २२ ऑगस्ट २०१६ ते  ७ मार्च २०२१ या कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. गॅरी म्हणजेच गुरुनाथ, राधिका आणि शनया या तीन पात्राभोवती गुरफटलेल्या मालिकेचे असंख्य चाहते होते. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मालिकेमुळे झी वाहिनीचा टीआरपी देखील वाढलेला पाहायला मिळाला. कारण काही वर्षे तर ही मालिका स्पर्धेत नंबर एक वरच टिकून होती. ही मालिका जशी संपली तसा झी वाहिनीचा टीआरपी सुद्धा खाली आलेला पाहायला मिळाला.

abhijeet khandkekar rasika anita date
abhijeet khandkekar rasika anita date

मधल्या काळात शनयाची भूमिका साकारणार रसिका सुनील परदेशी शिक्षणासाठी गेली होती. तिची भूमिका अभिनेत्री ईशा केसकर हिने साकारली होती. आपले शिक्षण झाल्यानंतर रसिका पुन्हा मालिकेत रुजू झाली. पण चार वर्षानंतर मालिकेचे वाढीव कथानक पाहून प्रेक्षकांना शेवट गुरुनाथ, राधिकाचा कंटाळा येऊ लागला. त्यामुळे अखेर मालिकेने निरोप घेण्याचा विचार केला. मालिकेने निरोप घेऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. मात्र आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गॅरी, राधिका आणि शनयाचे हे त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या २७ मार्च २०२३ पासून माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी चित्रमंदिर वाहिनीवर प्रसारित केली जात आहे.

isha keskar
isha keskar

झी मराठी वाहिनीने जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षक या मालिकेला पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद देतील अशी आशा आहे. झी मराठीचीच होणार सून मी ह्या घरची ही मालिका पुन्हा एकदा प्रसारीत करण्यात आली आहे. आणि त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आहे. याचाच विचार करून झी मराठीने त्यांची लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. प्रेक्षकांच्या आग्रहा खातर अशा काही जुन्या मालिका वाहिनीने प्रसारित कराव्यात अशी मागणी होत आहे. त्यात आभाळमाया, वादळ वाट, अग्निहोत्र या मालिकांची नावं आवर्जून घेतली जात आहेत. जुन्या परंतु दर्जेदार मालिकांचाही विचार वाहिनीने करावा असा आग्रह धरला जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.