राखी सावंतला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल राखीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला असून आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. आज राखी सावंत हिच्या डान्स अकॅडमीचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र त्याआगोदरच तिला कायद्याने बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळाल्या. राखी सावंत ही ड्रामा क्वीन आहे असे सगळेच जण म्हणतात. मीडियासमोर येण्यासाठी ती कायम काही ना काही तरी खुसपट काढत असते, असे तिच्या बाबत म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून आपले आईचे आजारपण आणि आदिलसोबत लग्न यामुळे ती सतत रडताना दिसली.
मात्र आता तिला पोलिसांनी अटक का केली याचे कारण नुकतेच समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी राखी सावंत हिने मॉडेल शर्लिन चोप्रा हीचे अश्लील व्हिडीओ मीडिया माध्यमातून प्रसिद्ध केले होते. हे व्हिडीओ शेअर करताना राखीने आक्षेपार्ह वक्तव्य केला आल्याचा आरोप शर्लिनने राखीवर लावला होता. ही बाब गंभीरपणे घेऊन शर्लिनने राखी वर एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी कारवाई केली असून राखीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी राखीला आता काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून मीडिया माध्यमातून कायमच चर्चेत आली आहे. काल ती आपल्या आईला भेटण्यासाठी गेली होती, तेव्हा तिने हिजाब परिधान केला होता. यावरून राखीला अनेकांनी ट्रोल सुद्धा केलं होतं.
सात महिन्यांपूर्वी राखी सावंत हिने आदिल दुराणी सोबत लग्न केलं होतं. मात्र तो हे लग्न अमान्य करतोय म्हणून तिने गोंधळ घातला होता. अखेर सलमान खानच्या हस्तक्षेपानंतर आदिलने राखी सोबत लग्न झाल्याचे कबुल केले. त्यानंतर राखी फातिमा खान दुराणी असे नाव मिरवताना दिसली होती. तिच्या खाजगी आयुष्यातलं हे वादळ हटतं न हटतं तोच आता राखीवर आणखी एक संकट कोसळलं आहे. शर्लिन विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तिला भोवलं असून पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामुळे राखी पुन्हा एकदा वादाच्या विळख्यात सापडलेली आहे. या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी राखी कायम संघर्ष करताना दिसली. या संघर्षात तिला सलमानची वेळोवेळी मदत मिळाली. तिच्या आईच्या उपचारासाठी लागणारा खर्च आता अंबानी कुटुंबियांनी घेतला असल्याने राखीने पैशांची चिंता सोडली होती.