Breaking News
Home / मराठी तडका / श्रावणी आणि सत्याच्या लग्नानंतरची गोष्ट पहायला मिळणार फक्त ९९ रुपयांत.. कधी, कुठे जाणून घ्या
satya shravani marriage
satya shravani marriage

श्रावणी आणि सत्याच्या लग्नानंतरची गोष्ट पहायला मिळणार फक्त ९९ रुपयांत.. कधी, कुठे जाणून घ्या

​वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन वीस दिवस झाली आहेत. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बॉक्सऑफिसवर चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. काल बुधवारपर्यंत वेड चित्रपटाने आपल्या खात्यात हा गल्ला जमवला असल्याने रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच वेड चित्रपटात मोठे बदल केले असल्याचे रितेशने जाहीर केले आहे. वेड चित्रपट श्रावणी आणि सत्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे, मात्र श्रावणी आणि सत्यावर कुठलेही रोमँटिक सॉंग चित्रपटात पाहायला मिळाले नाही. रितेशला आपल्या चित्रपटात ही उणीव जाणवली आणि चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली.

satya shravani marriage
satya shravani marriage

खरं तर चित्रपट रिलीज होऊन आता जवळपास २० दिवस झाली आहेत. चित्रपट सुपरडुपर हिट सुद्धा झाला, मात्र आता चित्रप​​टात बदल करण्याचे रितेशने ठरवले आहे. श्रावणी आणि सत्यावर वेड चित्रपटाचे शीर्षक गीत पुन्हा एकदा चित्रित झाले. चित्रपटाच्या अखेरीस दोघांचेही लग्न झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. येत्या २० जानेवारी पासून चित्रपटात केलेतील हा बदल प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. सलमान खान सोबतचे वेड लावलंय गाणं शेवटी होतं, ते मध्ये कुठेतरी असायला हवं असं प्रेक्षकांचं म्हणणं होतं. यावर सुद्धा रितेशने विचार केल्याने हे गाणं चित्रपटाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. तर खुशी, अशोक सराफ, श्रावणी, विद्याधर जोशी यांना सुद्धा अभिनयाची आणखी एक संधी दिली असल्याने त्यांच्यासोबतचे काही विस्तारित सिन टाकण्यात आले आहेत.

genelia riteish ved movie
genelia riteish ved movie

म्हणजेच वेड चित्रपटाचा पुढील काही भाग प्रेक्षकांना याच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २० जानेवारी रोजी सिनेमा लव्हर्स डे आहे. या दिवशी थिएटरमध्ये कुठलाही चित्रपट तुम्हाला केवळ ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. याच दिवशी वेड चित्रपटात विस्तारित बदल झालेला प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. खरं तर चित्रपटाच्या इतिहासात असे बदल करणे पाहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा सिक्वल न काढता श्रावणी आणि सत्याच्या लग्नानंतरचे आयुष्य प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटात हा सर्वात मोठा बदल घडून येत असल्याने प्रेक्षकांना सुद्धा लग्नानंतरच्या आयुष्याची गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे हा पुढचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच गर्दी करणार याची खात्री वाटते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.