Breaking News
Home / बॉलिवूड / बिग बॉसच्या शाळेत पेरेंट मिटिंग पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात..
sumbul touqeer parents
sumbul touqeer parents

बिग बॉसच्या शाळेत पेरेंट मिटिंग पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात..

हिंदी बिग बॉसचा सोळावा सिजन सुमबुल खान, शालीन भनोट, टीना दत्ताच्या प्रेम प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या तिघांच्याही वागण्याचा धसका हिंदी बिग बॉसने घेतला असल्याची चिन्हं आता नॅशनल टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या आजवरच्या कुठल्याही सिजनमध्ये पाहण्यात आले नाही अशा घटना ह्या सिजनमध्ये घडत आहेत. हे पाहून प्रेक्षकांनी मात्र या शोची चांगलीच खिल्ली उडवली आहे. हिंदी बिग बॉस सुरू झाला तेव्हापासूनच सुमबुल खान आणि शालीन भनोट एकमेकांच्या प्रेमात गुंतत गेल्याचे दिसून आले. सुमबुलच्या अशा वागण्यावर तिच्या वडिलांनी नाराजी दाखवली.

sumbul touqeer parents
sumbul touqeer parents

शालीन सुमबुलचा वापर करतोय असा आरोप त्यांनी बिग बॉसच्या मंचावर येऊन लावला होता. यागोदरच्या सिजनमध्ये सदस्यांच्या घरच्यांना आमंत्रित केले गेले होते. मात्र सुमबुलच्या बाबतीत हिंदी बिग बॉसने तिला वेगळी ट्रीटमेंट दिली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही चर्चा निवते न निवते तोच आता सुमबुलचे वडील आणि टिनाच्या आईमध्ये जोरदार वाद सुरू झालेले दिसले. काही दिवसांपूर्वी हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये सुमबुल शालीनच्या प्रेमात वेडी झाली असे चित्र दिसले. अगदी सलमान खानने देखील त्या दोघांच्या वागण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा बिग बॉसच्या सेटवर सुमबुलच्या वडिलांना पुन्हा एकदा बोलावण्यात आले. वडिलांनी यावेळी सुमबुलला चांगली समज दिलेली पाहायला मिळाली.

sumbul touqeer shalin bhanot
sumbul touqeer shalin bhanot

सुमबुलच्या वडिलांनी समजावण्या ऐवजी टिनाला अपशब्द वापरले. सुमबुलच्या वडिलांचे वादग्रस्त विधान ऐकून टिनाच्या आईने जाब विचारल्यावर सुमबुलच्या वडिलांनी माफी मागितली. मी असे अपशब्द कधीही वापरत नाही, माझ्या मुलींना देखील मी कधीच वाईट शिकवलं नाही. मी असं एकदा बोललो माझ्याकडून हे शब्द कसे गेले मला माहित नाही पण तुमची मुलगी माझ्या मुलीला सारखं घालूनपाडून बोलते ते तुम्हाला दिसत नाही. असे ते टिनाच्या आईला म्हणाले मात्र आता हा वाद चक्क बिग बॉसच्या मंचावरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुमबुलचे वडील आणि टिनाची आई आमनेसामने या मंचावर येऊन झालेला वाद मिटवण्यासाठी जमले आहेत.

सलमान खान देखील त्यांच्यात वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या हे चित्र पाहून बिग बॉसच्या शाळेत पेरेंट्स मिटिंग भरवली जात आहे असे म्हणत प्रेक्षकांनी बिग बॉसची खिल्ली उडवली आहे. जर घरातील सदस्यांमुळे आई वडिलांमध्ये वाद होत असतील तर त्यांना ह्या घरात कशासाठी ठेवलं म्हणत या प्रेक्षकांनी डोक्यालाच हात लावला आहे. बिग बॉसच्या शुक्रवार की वॉर मध्ये सुमबुलचे वडील पुन्हा एकदा हजेरी लावताना दिसणार आहेत. तिथेच टिनाची आई देखील त्यांच्या विधानाचा समाचार घेत आहे. नॅशनल टीव्हीवरची ही पेरेंट्स मीटिंग पाहून प्रेक्षकांना हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.