Breaking News
Home / जरा हटके / आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल..
rupali bhosale
rupali bhosale

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल..

​​आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. तिच्यावर छोटीशी शस्रक्रिया करण्यात आल्याने विश्रांतीसाठी ती गेले काही दिवस पुण्यामध्ये वास्तव्यास होती. गेल्या बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मधुराणी आता पुन्हा मा​​लिकेत परतलेली दिसली. तिच्या येण्याने मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. आशूतोषच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ती त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेणार होती. मात्र अशुतोषची मैत्रीण अनुष्काची या मालिकेत एन्ट्री झाल्याने तिने हा विचार मागे घेतल्याचे पाहायला मिळाले.

rupali bhosale
rupali bhosale

या सर्व घडामोडी घडत असताना मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीने आरोग्याच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. काल रुपालीवर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. हॉस्पिटलमधील काही फोटो तिने शेअर केले. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये रुपालीवर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ती म्हणते की, स्वतःची काळजी घेणे म्हणजे आप्तजणांची विशेष काळजी घेण्यासारखे आहे. झाड जितके निरोगी तितके चांगले फळ देऊ शकते. आयुष्यात अनपेक्षित गोष्टी येत राहतात, आपण फक्त त्याला हसत हसत सामोरं गेलं पाहिजे.

rupali bhosale aai kuthe kay karte
rupali bhosale aai kuthe kay karte

काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, आता मी बरी होत आहे. रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मनापासून धन्यवाद. बर्‍याच वेळा आपल्याकडे शरीरातील वेदना असह्य होईपर्यंत दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. मी देखील या परिस्थितीला सामोरी गेले. त्यामुळे मी सर्वांना काळजीपोटी विनंती करते की डॉक्टरांना त्वरित भेटून दुखण्याचे निदान करून घ्या. डॉ रेखा थोटे यांच्या मार्गदशनाखाली अतिशय काटेको​​र पद्धतीने माझ्यावर उपचार झाले. माझ्या तब्येतीची अविरत काळजी घेणारे कर्मचारी, सिस्टर यासर्वांची मी कायम ऋणी असेल.​ ​साहजिकच या सर्जरीमुळे रुपाली भोसले सध्या मालिकेतून ब्रेक घेत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी ती या मालिकेत दिसणार नसल्याचे तिने सांगितले आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.