Breaking News
Home / बॉलिवूड / हिंसक प्रकरणावरून शिव ठाकरेच्या घरच्यांची प्रतिक्रिया..
archana gautamm shiv thakare
archana gautamm shiv thakare

हिंसक प्रकरणावरून शिव ठाकरेच्या घरच्यांची प्रतिक्रिया..

बिग बॉस हिंदी सिजन १६ मध्ये नुकतीच एक हिंसक घटना घडली आहे. या घटनेमुळे अर्ध्या रात्री अर्चना गौतम हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर हाकलण्यात आले आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात एक मोठा वाद झाला. खरं तर अर्चना तिचं मत व्यक्त करत होती, त्यावेळी शिवने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्चनाला शिवचा राग आला. तू या गोष्टीत पडू नकोस असे अर्चना त्याला सूनावत होती. तेव्हा शिवने त्याची बाजू मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यामुळे चिडलेल्या अर्चनाने शिवचा गळा आवळला आणि मार खाशील अशी धमकी दिली. शिवने देखील अर्चनाला प्रतिउत्तर दिले.

archana gautamm shiv thakare
archana gautamm shiv thakare

अर्चनाच्या या वागण्यामुळे घरात एकच गोंधळ उडालेला दिसला. शालीन भनोटने तर अर्चनाच्या या वागण्यावर आक्षेप घेतला आणि अर्चना विराधात आपला आवाज उठवला. सोबतच निम्रत कौरने देखील बिग बॉसला या वादाकडे लक्ष्य घालण्याची मागणी केली. कॅमेऱ्यासमोर उभं राहून निम्रत अर्चनाच्या वागण्यावर संताप व्यक्त करत होती. घरातील बाकीच्या सदस्यांनी देखील अर्चनाच्या वागण्यावर आक्षेप घेतला. ही घटना हिंसक असल्याने बिग बॉसने देखील यावर कठोर निर्णय घेत अर्चनाला ताबडतोब घराबाहेर पडण्यास सांगितले. अर्चनाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले म्हणून तिच्या चाहत्यांनी विरोध दर्शवला. अगदी शिवला देखील त्यानी धारेवर धरलेले दिसले. अर्चनाला पुन्हा घरात बोलावले जावे, तिच्यामुळेच बिग बॉसचा शोचा टीआरपी वाढला होता अशी मागणी जोर धरताना दिसली.

shiv thakare nimrit ahluwalia
shiv thakare nimrit ahluwalia

यावर अर्चनाचीच यात चूक असल्याचा एक व्हिडिओ बिग बॉसच्या टीमने शेअर केला. ज्यात अर्चना शिवसोबत वाद घालताना दिसली. तिने शिवला कानाखाली वाजवण्याची धमकी देत त्याचा गळा पकडला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शिवच्या बाजूने मतं मांडण्यास सुरुवात केली. हे प्रकरण पाहून शिवची बहीण आणि त्याचे आईवडील देखील खूपच घाबरले आहेत. काल झालेल्या प्रकाराबद्दल शिवची बहीण मनीषा हिने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. ती याबाबत म्हणते की, मला हे कळले की काल रात्री बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसाचाराची घटना घडली आणि त्यात शिव सहभागी होता. अशी घटना घडायला नको होती. तिची कृती पूर्णपणे चुकीची होती. तुला बोलायचं तेवढं बोल पण कुणावर हात उचलायची गरज नव्हती.

अर्चनाने चुकीचे केले, मला आनंद आहे की शिवने तिला तिच्यासारखीच प्रतिक्रिया दिली नाही. शिव अतिशय समंजस मुलगा आहे, तो कधीही असे वाईट कृत्य करणार नाही. जर घरातील इतर सदस्य शिवच्या बाजूने बोलत असतील तर त्यात सर्वस्वी चूक ही अर्चनाचीच आहे हे स्पष्ट दिसून येते. तिने आज शिवचा गळा पकडला आहे उद्या आणखी काही करेल. कारण ही मुलगी जेव्हापासून घरात आली तेव्हापासून ती प्रत्येकाशी भांडलेली आहे. मी बातमी ऐकली तेव्हा मी माझ्या आईवडिलांची भेट घेतली, या बातमीमुळे ते खूप घाबरले होते. शिव कसा आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते; म्हणून मी बिग बॉसच्या आयोजकांशी संपर्क साधला. तो सुखरूप असल्याचे समजल्यावर मी पुन्हा माझ्या नवऱ्याच्या घरी गेले.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.