सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटात देखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच तो आता एका नव्या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिध्दार्थने त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार सोबत घटस्फोट घेतला असे बोलले जात होते. दरम्यान परदेशात ट्रिप एन्जॉय करताना या दोघांनी आपल्या लेकींसोबत एकत्र वेळ घालवला होता. ही चर्चा समोर येत असतानाच तृप्तीने तिच्या इंस्टाग्रामवरून सिध्दार्थचे नाव हटवून तृप्ती अक्कलवार केले होते. त्यामुळे या चर्चेला अधिक रंग चढत गेलेला पाहायला मिळाला.
बऱ्याचदा सिद्धार्थ त्याच्या दोन्ही लेकींसोबत पाहायला मिळतो. फक्त एवढ्यावरून त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असा तर्क लावण्यात आला होता. ट्रिपमध्ये पत्नीसोबतचा फोटो शेअर न करता त्याने आपल्या लेकींचाच फोटो शेअर केल्याने या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला. तृप्ती आणि सिद्धार्थ यांचे लव्ह मॅरेज आहे, त्यांनी विभक्त होऊ नये असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे होते. परंतु प्रसार माध्यमांतून पसरलेली हि घटस्फोटाची बातमी साफ चुकीची होती. यावर सिद्धार्थने आमच्यात सर्वकाही आलबेल आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. तृप्ती घरसंसार संभाळण्यासोबतच बिजनेसवुमन देखील आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. दोन वर्षांपूर्वी तृप्तीने दादर येथे स्वतःचे सलून उभारले होते. दादर येथील रानडे रोडवरील तिचे लॅकमे सलुन देखील आहे.
या सालूंच्या उदघाटनाला अंकुश चौधरी आणि मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. हा व्यवसाय सुरू असतानाच तृप्तीने आणखी एक कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. स्वरा आणि इरा या दोन लेकीच्या नावाचे आद्याक्षर घेऊन ‘स्वइरा’ या नावाने तिने हा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाची कल्पना तृप्तीची खास मैत्रीण श्वेता शिंदे हिला सुचली होती. त्यामुळे एकमेकांना साथ देत त्यांनी आपला नवा ब्रँड बाजारात आणण्याचे धाडस केले आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात या ब्रॅंडचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यावेळी तेथे तृप्ती आवर्जून हजर राहिली होती. आपलं स्वप्न पूर्ण झालं, असे म्हणत तृप्तीने या व्यवसाय संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तीच्या या नवीन व्यवसायानिमित्त मराठी सेलिब्रिटींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.