Breaking News
Home / मालिका / श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण

श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण

चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले. या प्रवासात वेगवेगळे अनुभव मिळाल्याचे श्रेयस आवर्जून सांगताना दिसतो. सहकलाकारांशी आणि प्रेक्षकांशी एक भावनिक नातं निर्माण होत असताना श्रेयस खूपच भारावून गेला आहे.

shreyas talpade majhi tujhi reshimgath
shreyas talpade majhi tujhi reshimgath

आपल्या सहकलाकारांकडून मिळालेले प्रेम, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि मालिकेमुळे मिळालेले नवीन प्रोजेक्ट या सर्व गोष्टी माझ्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. या सर्वांचे आभार मानताना श्रेयस म्हणतो की, माझी तुझी रेशीमगाठचे एक वर्ष पूर्ण झाले. माझ्यासाठी सर्व काही बदलून टाकणारा या शोमध्ये मी खूप सारे नवीन मित्र बनवले. अनेक नवीन आठवणी आणि मला ऑफर केलेले काही सर्वोत्तम चित्रपट देखील मिळाले! हि मालिका माझ्यासाठी खरोखरच आशीर्वाद आहे. त्यामुळे ‘धन्यवाद’ ची यादी जरा लांबलचक आहे. अजय मयेकर, एवढा मोठा संघ फक्त तुम्हीच एकत्र ठेवू शकता आणि  प्रत्येकाला न्याय देता. एक उत्तम मार्गदर्शक असल्याबद्दल धन्यवाद.

majhi tujhi reshimgath actors
majhi tujhi reshimgath actors

न रागावता मी केलेले बदल समजून घेतल्याबद्दल आणि मालिकेतील काम मजेदार आणि सोपे बनवल्याबद्दल देखील धन्यवाद. नेहा, प्रार्थना बेहरे तुझ्या बद्दल काय सांगू. मला तुझ्यात एक खरा मित्र सापडला. तू नेहमी म्हणतेस, आपली छान टीम आहे. यशला खूप छान पद्धतीने सादर केल्याबद्दल धन्यवाद. सेटवरील कंटाळवाणे क्षण हलके केल्याबद्दल धन्यवाद. आपण एकत्र एखादा चित्रपट नक्कीच करूया. मायरा, छोट्या परी तुझेही आभार. आमच्या आयुष्यातील सर्वात गोड मीठाई असल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला मोठ्या मोठ्या मिठी पाठवत आहे. संकर्षण कऱ्हाडे, काय बोलू मी.

मला तुझ्यात एक मित्र आणि एक धाकटा भाऊ सापडला. माझा सर्वोत्कृष्ट सोबती आणि अप्रतिम अभिनेता असल्याबद्दल धन्यवाद. तू असा मित्र आहेस ज्याला प्रत्येकाच्या आयुष्यात हवाहवासा वाटेल. अतुल महाजन, शीतल क्षीरसागर, स्वाती पानसरे, आनंद काळे, स्वाती देवल, केळकर काका, मानसी ताई, राजेश शिर्के, सुनील भोसले तुम्ही सेटवर रोजचा दिवस मजेदार बनवल्याबद्दल तुमचेही धन्यवाद! मी तुम्हा सर्वांवर भरभरून प्रेम करतो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.