Breaking News
Home / मालिका / झी मराठीवरील मन उडू उडू झालं घेणार प्रेक्षकांचा निरोप.. नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का
man udu udu jhala serial
man udu udu jhala serial

झी मराठीवरील मन उडू उडू झालं घेणार प्रेक्षकांचा निरोप.. नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का

​काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्याजागी नव्या दमाच्या मालिका सुरू केल्या जात आहेत. किचन कल्लाकार, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, बँड बाजा वरात आणि आता मन उडू उडू झालं यांच्या जागी नवीन दमाच्या मालिका पाहायला मिळणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स, बस बाई बस हे नवीन रिऍलिटी शो तसेच नवा गडी नवं राज्य या नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहेत.​ मन उडू उडू झालं ही मालिका देखील प्रेक्षकांचा नीरोप घेणार आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून रात्री ७.३० वाजता ‘तू चाल पुढं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

man udu udu jhala serial
man udu udu jhala serial

या मालिकेत दीपा परब मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपा परब ही मराठी सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी आहे. मुलाच्या जन्मावेळी दीपा अभिनय क्षेत्रापासून काहीशी दुरावली होती.​ दीपा परब, धनश्री काडगावकर, देवेंद्र दोडके, वैष्णवी कल्याणकर ही कलाकार मंडळी या मालिकेत झळकणार आहे. अन्नपूर्णा विठ्ठल या देखील मराठी सृष्टीत पुन्हा पाहायला मिळणार आहेत. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्या काम करत होत्या. मात्र मालिकेच्या कलाकारांकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक पाहून त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या झी मराठी वाहिनीवर झळकताना दिसणार आहेत. बऱ्याच वर्षानंतर दीपा परब मराठी मालिकेकडे वळली आहे.

tu chal pudha new serial
tu chal pudha new serial

या अगोदर तिने हिंदी मालिकेतून महत्वपूर्ण भू​​मिका साकारल्या होत्या. चकवा, मित, अंड्याचा फंडा, क्षण, रेत, मराठा बटालियन, शौर्य और अनोखी की कहाणी, थोडी खुशी थोडे गम अशा चित्रपट आणि हिंदी मालिकांमधून तिने आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तू चाल पुढं या मालिकेत दीपा प्रथमच छोट्या पडद्यावर मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. लग्नानंतर चूल आणि मूल सांभाळण्यात गृहिणीचे आयुष्य निघून जाते. आपली स्वप्न साकार करण्यासाठी तिला तिच्या पायावर उभे राहण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती ब्युटी पार्लर सुरू करते ‘ति’ ची हीच कहाणी दीपा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या नवीन मालिकेसाठी आणि मराठी सृष्टीत पुनःपदर्पणासाठी दीपा परबला खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.