माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून काही दिवसांसाठी नेहा लंडनला ट्रेनिंगसाठी गेलेली असते. मात्र ७ मे रोजी सोनाली कुलकर्णीचे लंडन येथे लग्न पार पडले. त्यानिमित्ताने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहता यावे म्हणून तिला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला आहे. असे असले तरी प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळत आहे. नेहा लंडनला गेली असल्याने यश परीची काळजी घेत आहे. नुकताच ओजसच्या वाढदिवसाच्या दिवशी परी आणि यशने त्यांच्या घरी हजेरी लावली. नेहा इथे असती तर तिने सगळ्यांना मदत केली असती. त्यामुळे यशदेखील सगळ्यांना मदत करताना पाहायला मिळाला.
ओजसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यश परीचे मन जिंकताना दिसला. मालिकेत ओजस आणि परीची गट्टी सगळ्यांनाच परिचित आहे. आज या ओजसबद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. परीचा खास मित्र म्हणजेच ओजसची भूमिका साकारली आहे कृष्णा महाडिक या बालकलाकाराने. माझी तूझी रेशीमगाठ ही कृष्णाने अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका आहे. या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या कृष्णाला नुकतेच पे टीएम च्या व्यावसायिक जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. कृष्णाचे वडील अभिजित महाडिक हे देखील अभिनेते आहे. त्यांनी हिंदी मराठी मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतून ते आयपीएस विनायक माने सरांची भूमिका साकारताना दिसत आहेत.
नवे लक्ष्य, जय जय स्वामी समर्थ, स्वराज्यजननी जिजामाता, सोन्याची पावलं, स्पेशल पोलीस फोर्स. नमक ईस्क का, मोलकरीण बाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मालिकांमधून अभिजित यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. मागील काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी या दोघा बाप लेकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर केले होते. त्याला चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. यातूनच कृष्णाला देखील अभिनयाची आवड निर्माण झाली आणि मालिकेसाठी त्याने ऑडिशन दिली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्याला मायरा वायकुळ सोबत झळकण्याची संधी मिळाली. मालिकेतून काम करत असतानाच कृष्णा जाहिरात क्षेत्राकडे देखील वळला आहे. अभिनयाच्या त्याच्या या प्रवासात त्याला असेच यश मिळत राहो हीच एक सदिच्छा.