Breaking News
Home / नाटक / हृषिकेश आणि प्रियदर्शन निघाले छुपे रुस्तम.. ​भानगडीचा ​खुलासा होणार ​रविवारी
hrushikesh joshi priyadarshan jadhav
hrushikesh joshi priyadarshan jadhav

हृषिकेश आणि प्रियदर्शन निघाले छुपे रुस्तम.. ​भानगडीचा ​खुलासा होणार ​रविवारी

लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही क्षेत्रात प्राविण्य मिळवत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. साधे सरळ स्वभावाचे हे दोघेही सध्या नाट्यवर्तुळात छुपे रुस्तम असल्याची चर्चा रंगली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि का बरं यांना छुपे रुस्तम म्हटलं जातय! नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली असेल. या सगळ्याचा खुलासा रविवारी होणार आहे. हरहुन्नरी अभिनेते हृषिकेश आणि प्रियदर्शन छुपे रुस्तम या नवीन नाटकासाठी एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. विजय केंकरे दिग्दर्शित, प्रवेश व दिशा निर्मित दोन अंकी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

hrushikesh joshi priyadarshan jadhav
hrushikesh joshi priyadarshan jadhav

हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी काहीतरी खुमासदार घेऊन येत आहे. लपवाछपवी, फार्स, गंमत, गॉसिप अशा गोष्टींनी हे नाटक रंगत जाते. खास विजय केंकरे धाटणीच्या नाटकात काम करणे ही कलाकारासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे म्हणाले. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत शंभर टक्के खरं कधीच कोणी वागत नसतं. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधील असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे छुपे रुस्तम हे नाटक. द लाय या फ्रेंच नाटकावर हे नाटक आधारित आहे. हृषिकेश आणि प्रियदर्शन या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात साथ देत आहेत.

chupe rustam natak
chupe rustam natak

विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं. रविवार १५ मे दुपारी ४.१५ वा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले आणि सोमवार १६ मे दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर दादर येथे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी छुपे रुस्तम नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं गलती से मिस्टेक या धम्माल विनोदी नाटकासाठी ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं डोन्ट वरी हो जाएगा यासारख्या नाटकाची निर्मिती केली होती. तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब व प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.