Breaking News
Home / जरा हटके / सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश वाघमारे या सिलेब्रिटी दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे, त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यांच्या या गोड बातमीवरून सहकलाकारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

sukh mhanje kay asta serial
sukh mhanje kay asta serial

बाळूमामाच्या नावानं चांगभलं, नाळ अशा चित्रपट आणि मालिकेमधून मीनाक्षी झळकली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे तिच्या अनुपस्थितीत देवकीची भूमिका अभिनेत्री भक्ती रत्नपारखी निभावताना दिसत आहे. अर्थात मिनाक्षीने देवकीची भूमिका गाजवल्याने भक्तीसाठी ही भूमिका तितकीच कठीण ठरणार आहे हे प्रेक्षक जाणून आहेत. मात्र भक्ती देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे त्यामुळे ती ही भूमिका सहज वठवू शकते असा विश्वास आहे. मिनाक्षीने ड्राय डे, मनातल्या उन्हात चित्रपट अभिनेता कैलाश वाघमारेसोबत लग्न केलं. बाळाच्या आगमनापूर्वी ‘दोनाचे चार झाले’ असे म्हणत या दोघांनी गाडी खरेदी केली होती.

minaxi rathod kailash waghmare
minaxi rathod kailash waghmare

कैलाश वाघमारे ह्याने देखील मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कमावले आहे. तानाजी या बॉलिवूड चित्रपटात कैलाशने चुलत्याची भूमिका गाजवली होती. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, दिठी, एक पंजाब ये भी अशा अनेक दर्जेदार चित्रपट नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी सृष्टीत त्याने स्वतःची ओळख निर्माण केलीच आहे शिवाय हिंदी सृष्टीतही तो अनेक दर्जेदार नाटकातून काम करताना दिसतो. मीनाक्षी राठोड आणि कैलाश वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्तीच्या खूप खूप शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.