मराठी हिंदी चित्रपटासोबतच निवेदिता सराफ यांनी मालिका सृष्टीत पदार्पण केले. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मालिकेला मिळालेला पुरेसा प्रतिसाद पाहून अग्गबाई सुनबाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली यात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची जुळून आलेली केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. मधल्या काळात त्यांनी मी स्वरा आणि ते दोघे या नाटकातून काम केले. आता पुन्हा एकदा त्या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवर ४ एप्रिल पासून रात्री ९.३० वाजता भाग्य दिले तू मला ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत. यासोबत निवेदिता सराफ, योगेश केळकर, जान्हवी किल्लेकर आणि पूर्वा कौशिक यांच्याही या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. निवेदिता सराफ नायकाच्या आईच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे एक सोज्वळ सासूच्या भूमिकेत त्या अगदी फिट बसलेल्या पाहायला मिळणार आहेत. भाग्य दिले तू मला ही नवी मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक असणार आहे.
कलर्स मराठी, स्टार प्रवाह या वाहिनीवर बहुतेक मालिका कोणत्या ना कोणत्या मालिकांचा रिमेक असल्याचे दिसून येते. किरण राज आणि रंजनी राघवन यांनी या कन्नड मालिकेतून मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या जुळून आलेल्या अफलातून केमिस्ट्री नंतर या नव्या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत. या नव्या मालिकेसाठी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सर्व सह कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.