Breaking News
Home / मालिका / यशच्या आई वडिलांचा मृत्यू कसा झाला.. काकांडून यशला समजणार सत्य
mazi tuzi reshimgath neha yash pari

यशच्या आई वडिलांचा मृत्यू कसा झाला.. काकांडून यशला समजणार सत्य

​माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी घर सोडून निघून जाते. परीमुळे नेहाच्या आयुष्यात वाईट घडत असतं असं मामी परीला सांगत असते. आपल्यामुळे आईला त्रास नको म्हणून घर सोडून ती एका पाणीपुरी ​​वाल्याकडे जाऊन बसते. परंतु पाणीपुरीवाला त्याच्या हुशारीने गुपचूप पोलिसांना परी माझ्याकडे असल्याचे सांगतो. त्याचे हे बोलणे परी ऐकत असते​.​ आणि मी इथे आहे हे तू जर कोणाला सांगितलं तर तूच मला पळवून आणलं असं मी सगळ्यांना सांगेन असे परी म्हणते. मात्र पाणीपुरीवाल्याकडे परी आहे हे यशला समजते​.​ तेव्हा यश आणि नेहा त्या ठिकाणी जाऊन परीला भेटतात आणि तिला घरी घेऊन येतात​.​

mazi tuzi reshimgath neha yash pari
mazi tuzi reshimgath neha yash pari

यावर तू पुन्हा असं कधीच करायचं नाही म्हणून समजावून सांगतात.​ तर तिकडे काका यश जवळ एक गुपित उघड करताना पाहायला मिळणार आहे. यशचे काका सतत दारू का पितात याचे कारण त्यांनी त्याला सांगितलेले नसते​.​ मात्र आज अचानकपणे काका यशच्या आई वडिलांच्या मृत्यू बाबत एक खुलासा करताना दिसतात. यशच्या आईवडिलांचा अपघात त्याच्या काकाकडून झालेला असतो. हे तो यशला सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र काका दारूच्या नशेत असल्याने त्यांना ते बोलता आलेले नसते.​ ​परंतु आता यशचे जेव्हा लग्न होईल तेव्हाच मी हा खुलासा करेन असे तो मनात म्हणतो. आपल्याच काकांकडून आई वडिलांचा अपघात झाला हे समजल्यावर यश त्याच्या काकांना माफ करणार का?

shreyas talpade prarthana behere
shreyas talpade prarthana behere

यश आणि काकांच्या या वडीलकीच्या नात्यात आडकाठी तर निर्माण होणार नाही ना. हे येत्या काही दिवसात मालिकेतून पाहायला मिळणार आहे.​ परीमुळे आजोबांची तब्येत बिघडली असा गैरसमज पसरवणाऱ्या सिम्मी काकु​ आजोबांना परी आठवते की नाही हे विचारते​.​ मात्र ते नेहा आणि यशचे लवकरात लवकर लग्न लागावे म्हणून आतुरतेने वाट पाहत असतात. या लग्नाला छोट्या परीची सहमती खूप महत्वाची होती जी नेहा आणि यशला मिळाली खरी. तर नेहाला लवकरच चौधरी कुटुंबाची सून म्हणून घरात यावी अशी आजोबा इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.