सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या जागी आता ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. सासू सून नणंद मालकांमधील भांडणांना बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत असून रितेशची भूमिका संचित चौधरी याने निभावली आहे. आईजींची भूमिका उषा नाडकर्णी यांनी साकारली असून त्यांची भूमिका सुनांवर धाक दाखवणारी आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी या मालिकेतून सुभद्राची भूमिका आपल्या अभिनयाने चोख बजावली आहे. घराण्याची पारंपरिक शंभर वर्षांपूर्वीची अंगठी सुभद्राकडून गहाळ होते.
या कारणास्तव सुभद्राला सदाशिवराव कानाखाली लगावतात. मात्र त्यानंतर रितेश आपल्या आईची बाजू घेताना दिसतो. आईची हरवलेली अंगठी काव्याला मिळते हे ती रितेशला सांगते. त्यामुळे ती अंगठी मिळवण्यासाठी रितेश काव्याशी फोनवरून संवाद साधतो. या भानगडीत तो मोबाईलमध्ये काव्याचे नाव कडू कारलं या नावाने सेव्ह करतो. रितेशने आपलं नाव कडू कारलं म्हणून सेव्ह केलं असल्याने काव्या रितेशवर नाराज होते. त्यांची ही नोकझोक मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कडू कारलं रितेशवर पुन्हा रागावलं आहे. सुकन्या मोने, प्रसाद पंडित, दीपक आलेगांवकर, ओम जंगम, विजय पटवर्धन, वेदश्री दळी, संयोगिता भावे, दीपक ठाकरे असे कसलेले कलाकार या मालिकेला लाभले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दीपक आलेगांवकर यांनी या मालिकेतून आजोबांची भूमिका साकारली आहे. बऱ्याच कालावधीनंतर त्यांचेही या मालिकेतून पुनरागमन होत आहे. सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी यांनी या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. काव्या रितेश सोबत लग्न झाल्यानंतर सासूची बाजू घेताना दिसणार आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. फक्त सदाशिवरावांनी सुभद्रावर हात उचलणे ही बाब प्रेक्षकांना खटकली . त्यामुळे प्रेक्षकांनी यावर थोडीशी नाराजी दर्शवली होती. उषा नाडकर्णी यांनी नेहमीप्रमाणेच दमदार आणि तितकीच खाष्ट सासूची भूमिका या मालिकेत साकारली आहे. लग्नानंतर काव्या आपल्या सासूला आईजींच्या जाचातून कशी सुटका करवून घेते हे पाहणे अधिक रंजक होणार आहे.