१९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधील पंडितांनी आतंकवाद्याच्या अत्याचाराला कंटाळून पलायन केले होते. ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या आगामी चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक असे बरेचसे कलाकार मंडळी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.
चिन्मय मांडलेकर याने या चित्रपटात विरोधी भूमिका दर्शवलेली पाहायला मिळत आहे. मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि पल्लवी जोशी याही मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत. सुरुवातीला चित्रपटाच्या प्रमोशन मध्येच अनेक अडथळे आल्याने विवेक अग्निहोत्री यांनी खंत व्यक्त केली होती. अगदी कपिल शर्माच्या शोमध्ये देखील आम्हाला आमंत्रित केले नसल्याची खंत त्यांनी सांगितली आहे. अर्थात हा सर्वस्वी निर्णय कपिल शर्माचा आहे की त्याने कोणाला बोलवावे. मी त्याचा आणि त्याच्या शोचा खूप मोठा फॅन आहे. आमच्या चित्रपटात कुठलाही मोठा स्टार कलाकार नसल्याने त्याने आम्हाला या शोमध्ये बोलविण्याचे टाळले आहे. बॉलिवूडची गोष्ट अशी आहे की एकदा मिस्टर बच्चन यांनी गांधी कुटुंबाबाबत म्हटले होते की, वो राजा है हम रंक.
जेव्हापासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. तेव्हापासून त्यांना धमक्या देणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स येऊ लागले.त्यामुळे एका ठराविक समुदायाने माझा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काळजी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी फक्त लोकांसमोर सत्य आणण्याचे काम केले आहे. चित्रपटातील शब्द न शब्द खरा आहे. चित्रपट पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की सांप्रदायिक मुद्द्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे की सामुदायिक आणि कट्टरवादीवर आक्षेप घेणारा आहे. परंतु चित्रपट पाहिल्यावर अवघ्या ५ मिनिटांनीच तुम्हाला याचा उलगडा होईल की असे यात काहीही नाही.
हा चित्रपट फक्त कश्मीरी पंडितांवर भाष्य करणारा नसून तो तमाम भारतीयांना उद्देशून बनवला आहे.काल काश्मीर मधील पंडितांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. चित्रपट संपल्यानंतर थिएटर्समध्ये उपस्थित असलेल्या या प्रेक्षकांना आपले अश्रू अनावर झाले होते. इतका हा चित्रपट आम्हाला भावुक करून गेला हे त्यांच्या प्रतिक्रियेवरूनच समोर आले. प्रेक्षकांना भवून करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शना आधीच हिट ठरला आहे, असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.