सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे अनेकदा सांगितले जाते. मात्र सोनाली पाटील हिच्या नावाने देखील आता लोकांची फसवणूक होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये सोनाली पाटील हिने सहभाग दर्शवला होता. या शोमधून सोनालीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. मात्र या शोमध्ये ती अंतिम पाचच्या यादीत स्वतःचे नाव नोंदवू शकली नाही ही खंत तिच्या चाहत्यांना होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोनाली अजून कुठल्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. आणि नव्या प्रोजेक्टबाबत अजूनही कुठली माहिती तिने दिलेली नाही.
मात्र एक स्टार म्हणून तिला नेहमी वेगवेगळ्या इव्हेंटला आमंत्रित करण्यात येत आहे. यासंदर्भात काही जणांची मात्र फसवणूक होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले आहे. प्रेक्षकांची फसवणूक होऊ नये म्हणून तिने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नावाचा वापर करून कोणीतरी फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच सोनाली पाटीलने आवाहन करत म्हटले आहे. मी कुठलाही नंबर माझ्या सोशल मीडियावर दिलेला नाही फक्त मेल आयडी आहे. आणि तरीसुद्धा मी कुठलेतरी कार्यक्रम घेतीये, इव्हेंट्स घेतीये याची ही ही रक्कम आहे आणि ती रक्कम तुम्ही आमच्या अकाउंटला टाका. असा फोन कोणीतरी अनोळखी व्यक्तीने केलेला आहे. आणि तो माझ्या मित्राचा मित्र अशा कोणीतरी रेफरन्सने मला समजला.
मला ही बाब परवा रात्री समजली, ज्यावेळेला मला असा फसवणूक होत असल्याचा मेसेज आला. त्यावेळेला मी तो नंबर घेऊन त्याची तक्रार दाखल केलेली आहे. तर प्लिज मी सध्या तरी कुठले इव्हेंट घेत नाहीये आणि जर मला हवे असतील तर मी आज किंवा उद्या एक मोबाईल नंबर सोशल मीडियावरील विंडोवर मेन्शन करेल. आणि तुम्ही प्रत्यक्षात मला संपर्क साधू शकता. पण प्लिज असे फेक नंबर चेक करा की तुम्ही माझ्याशीच संपर्क करत आहात की नाहीत ते. कारण अशा इव्हेंटसाठी मला कुठल्याही प्रकारे फोन आलेला नव्हता. माझ्यासोबत अशी घटना घडली आहे म्हणूनच मी हा खाजगी नंबर शेअर करत आहे.
परंतु फक्त काम असेल तरच मला संपर्क साधा. माझ्या चाहत्यांनाही असे आवाहन आहे की मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच संपर्क साधत असते. परंतु याबाबत मला सहकार्य करावे. असे म्हणून सोनालीने घडलेल्या घटनेबाबत प्रेक्षकांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे. सोनाली पाटील हिने वैजू नं १ आणि देवमाणूस या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. याच प्रसिद्धीमुळे सोनालीला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली होती. परंतु सध्या या फसवणुकीच्या कारणास्तव तिला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.