Breaking News
Home / मराठी तडका / ​मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. ​आता काय हाताला लागत नाय
kiran mane mavshi
kiran mane mavshi

​मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. ​आता काय हाताला लागत नाय

मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील विलास पाटीलची भूमिका अभिनेते किरण माने यांनी आपल्या अभिनयाने उठावदार केली आहे. ते नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत लिखाण करीत असतात. त्यांच्या भन्नाट तितक्याच भावस्पर्शी लिखाणाला नेटकऱ्यांची नेहमीच भरभरून दाद दिली आहे. अशीच एक अफलातून गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपल्या फलटणच्या मावशीसोबतचा किस्सा सांगितला आहे. लहानपणापासून जीवापाड जपणाऱ्या मावशीला किरण यांच्या भविष्याची खूप काळजी वाटायची त्यासंदर्भात काय लिहिलंय ते जाणून घेऊयात.

kiran mane mavshi
kiran mane mavshi

माझी फलटनची सुलामावशी ! ल्हानपनीपास्नं मी लै लाडका तिचा. अजूनबी कुठल्या लग्नसमारंभात आली की, “माझा किरन्या कुठंय, माझा किरन्या कुठंय.” करत शोधत येती. ल्हानपनी प्रत्येक सुट्टीत मी म्हैनाभर फलटनला असायचो. आबा आनि मावशीचं मला कुठं ठिवू आन् कुठं नको असं हुयाचं. मुलखाचं लाड करून घेतलं मी मावशीच्या राज्यात. माझ्या मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत भावांनो. टोकाचं वैभव आनि ऐश्वर्य अनुभवलं आणि त्याच जोडीनं जीवघेनी गरीबी, दु:ख, संकटांचाबी सामना केला ! पन कुठल्याही क्षनी मावशी मला हतबल निराश दिसली नाय. येईल त्या परीस्थितीला हिमतीनं आनि हसतमुखानं तोंड दिलं. लै खमकी आनि जबराट हाय माझी मावशी, माझ्यावर तिचीच सावली हाय. आज मावशीला पुन्हा सगळं ऐश्वर्य लाभलंय.

kiran mane dance performance
kiran mane dance performance

परीस्थिती बदलत र्‍हायली पन माझी मावशी नाय बदलली, जश्शी होती तश्शीच अजूनबी हाय, नादखुळा ! परवा नातीच्या लग्नात आली. आधीच फोन आलावता. “किरन्या..येनार हायेस ना? शुटिंग फिटींगची कारनं सांगीतलीस तर बघच. किती दिस झालं भेटला न्हाईस. आठवन येती का न्हाय मावशीची. का इसारलास?” मी म्हन्ल “येनारय गं. तुला भेटायसाठीच तर सुट्टी काढली.” भेटल्यावर मिठी मारुन, तोंडावरनं मायेनं हात फिरवत, कानशीलावर बोटं मोडत म्हन्ली, “रोज टी.व्ही.त बघती तुला, न चुकता. फलटनमधल्या वळखीच्या बायका म्हन्त्यात ह्यो इलास पाटील तुमचा पावना हाय व्हय? मी म्हन्ती, ‘आवो पोरगा हाय माझा.’ त्यास्नी खरंच वाटत नाय. आज फोटू काढ आपला म्हंजी दाखवीन सगळ्यांना.”

फोटो काढताना हळूच मला म्हन्ली, “मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं. आता काय हाताला लागत नाय. लै काळजी वाटायची तुझी. पन आज तुला बघून जीवाला बरं वाटतं. लै मोठ्ठा हो, कष्टाला कमी पडू नकोस. तुला हरीबुवा काय कमी पडू देनार नाय. आता हितनं फुडचं तुझं यश बघायला मी र्‍हाती का नाय कुनाला ठावं.” मी डोळ्यातलं पानी लपवत हसत म्हन्लो, “मावशे, काय धाड भरनाय नाय तुला. लै जगनार हायस तू.” मावशी कसंनुसं हसली. माझ्या काळजात उगीचंच कालवाकालव झाली. ‘मावशी’ ही गोष्टच नादखुळा निर्मान केलीय निसर्गानं गड्याहो ! लब्यू मावशे. लै लै लै जग, आनंदात रहा. तुला अभिमान वाटंल असंच काम करंल तुझा किरन्या.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.