बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा आज राजस्थानमधील सवाई माधोपूर फोर्ट बरवारा येथील सिक्स पंचतारांकित रिसॉर्टमध्ये विवाह झाला. लग्नाची बातमी अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. तसेच अत्यंत खाजगी आप्तजण, कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नसोहळा अगोदर पारंपरिक पद्धतीने मेहंदी, हळदी आणि संगीत यांचा समावेशकेला गेला होता.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे आज लग्न झाले आणि हो, त्यांनी पेहरावातील छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. काय, ते करणार नाहीत असे तुम्हाला वाटले? अखेर महिन्याभरापासून प्रसार माध्यमांच्या लग्नाच्या डेस्टिनेश चर्चेला पूर्णविराम मिळाला. कतरिनाने सब्यसाचीचा लेहेंगा परिधान केला होता. रुपेरी मंडप, घोडागाडी आणि वधूसाठी डोली अशा थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला. विकीसाठी विशेष फेटा आणि सेहरा तयार करून घेण्यात आला होता. हिंदू पद्धतीने झालेल्या या लग्नात लाल रंगाच्या लेहेंगा मध्ये कतरीना खूपच खुलून दिसत होती. सात फेरे घेताना त्यांचे फोटो विशेष आकर्षक दिसत आहेत. अंगद बेदी, कबीर सिंग, नेहा धुपिया, मिनी माथूर, गुरुदास मान यांनी सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे आदल्या दिवशी सलमानला एअरपोर्टवर पाहण्यात आले होते पण तो अरब कंट्री फ्लाईटने गेल्याची चर्चा रंगली होती.
या बहुचर्चित लग्न सोहळ्याचे प्रक्षेपण अधिकार एका खाजगी वाहिनीला दिल्याची खात्रीशीर माहिती समोर आली होती. रणवीर दीपिका यांनीही अशाच प्रकारे खाजगी वाहिनीला सर्व हक्क दिले होते. अनोखी वेशभूषा, सजावट आणि मोजक्या आप्त मंडळीचा सहभाग यावर चाहत्यांनी इंस्टावर रणवीर दीपिकाच्या पारंपरिक पद्धतीच्या लग्न सोहळ्याची आठवण काढली आहे. कतरीना कैफ आणि विकी कौशल या नवदांपत्याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.