Breaking News
Home / मालिका / माझ्यासाठी ही सर्वात शॉकिंग गोष्ट होती… गायत्रीच्या वागण्यावर निथा शेट्टीची प्रतिक्रिया
neetha shetty exit from big boss marathi
neetha shetty exit from big boss marathi

माझ्यासाठी ही सर्वात शॉकिंग गोष्ट होती… गायत्रीच्या वागण्यावर निथा शेट्टीची प्रतिक्रिया

मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री निथा शेट्टी हिने मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती परंतु दोन आठवड्यातच तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. निथा जर सुरुवातीपासूनच घरात राहिली असती तर ती कमीत कमी अजून काही दिवस तरी टिकली असती असे अनेकांचे म्हणणे आहे. कॅप्टनसीचा टास्क होता त्यावेळी निथाला मुलीनं दिलेलं पत्र गमवाव लागलं मात्र टास्क खेळायचा या हेतूनं तिने ते पत्र फाडलं देखील.

neetha shetty exit from big boss marathi
neetha shetty exit from big boss marathi

एका टास्कमध्ये खांब पकडण्यासाठी निथाने मन लावून प्रयत्न केले, टास्क खेळत असताना गायत्री सोबत तिचा वाद झाला. त्यावेळी गायत्रीचे वागणे निथाला योग्य वाटले नाही. गायत्रीने धक्का दिला त्यावेळी ती खोटं बोलली माझ्या आयुष्यातली ही सर्वात शॉकिंग बाब होती की लोकं एवढं खोटं कशी बोलू शकतात. मला तो टास्क खेळताना खरंच धक्का लागला होता, जी व्यक्ती खरं बोलतेय त्यांना तुम्ही खोटं कसं म्हणू शकता ह्याच कारणामुळे मी खूप अपसेट झाली होती आणि चिडली होती. गायत्री त्यावेळी संचालक असल्याने तिलाच तो निर्णय घ्यायचा होता. निथा बिग बॉसच्या घरात दोन आठवडे राहिली मात्र तिला काहीच बनवता येत नाही असा सूर घरात पाहायला मिळाला. याबाबत निथाने स्पष्टीकरण दिलं की, मला खरंच कुकिंग नाही करता येत आणि मी नेटवर पाहून काहीतरी बनवायचा प्रयत्न केला होता. बिग बॉसच्या घरात सुद्धा मी सगळ्यांना हेच सांगत होते की मला तुम्ही सांगा की कसं बनवायचय त्यावरून मी ते बनवू शकेल. मी लसूण वरून कन्फ्युज होते की कोणी लोकं लसूण फोडणीला टाकतात कोणी नाही टाकत, मात्र तरीही मी प्रयत्न केला पण ते सर्व वाया जात होतं.

beautiful neetha shetty salavi
beautiful neetha shetty salavi

स्नेहाच्या तोंडावरून मला ते सर्व दिसत होतं. मुळात मला या घरात राहायला खूप कमी वेळ मिळाला त्यामुळे मी कशी आहे हे दाखवू शकले नाही, की कोणता खेळ खेळू शकले नाही. माझ्याबाबत शेवटच्या क्षणी स्नेहाने स्टेटमेंट मांडल की हिला काहीच येत नाही. दुसऱ्याला खाली पाडायला ती कुठल्या थराला जाऊ शकते हे मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा आधल्या दिवशी अनुभवलंय असं निथा म्हणते. पुन्हा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घ्यायला तुला आवडेल का याबाबत निथाने स्पष्ट सांगितलं की मी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार नाही, मला अजून एक आठवडा ह्या घरात राहायची संधी मिळाली असती तर मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं असतं…

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.