सूर्यवंशी या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ यांनी हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये हजेरी लावली आहे. या शोचा नवीन प्रोमो नुकताच पाहायला मिळाला त्यात कतरीना कैफ सलमान खानवर आरोप करताना दिसली. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे ब्रेकअप होऊन अनेक वर्षे झाली आहेत पण बिग बॉसच्या शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटनिमित्ताने तिने तिथे हजेरी लावली आहे. यावेळी सलमान खानवर कतरीनाने गमतीगमतीत एक आरोप लावला आहे..
काल झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील कतरिना आणि रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली होती त्यादरम्यान कतरीनाने भाऊ कदम सोबत गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. हिंदी बिग बॉसच्या आजच्या विकेंडच्या विशेष भागात कतरीना आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल होत आहे. सलमान खान आणि कतरिना कधी एकेकाळी प्रेमात होते मात्र त्यांच्यात ब्रेकअप झाल्यानंतर एकमेकांना कसे ट्रीट करतात हे मीडियाच्या माध्यमातून अनेकदा पाहिले गेले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर गेलेल्या कतरिनाने सलमान खान वर आरोप लावला आहे की, कोरिओग्राफरने दिलेल्या डान्सस्टेप्स सलमान कधीच फॉलो करीत नाही. कतरीनाच्या ह्या आरोपावरून सलमान खानने लगेचच आपल्यावर झालेला हा आरोप मान्य केला आहे आणि त्यावर काय शिक्षा असेल ती मी पूर्ण करतो असेही म्हटले आहे. माझी स्तुती करावी अशी शिक्षा कतरीनाने सुनावताच सलमान खान कतरीनाची स्तुती करू लागतो. हे दोघे एकमेकांशी बोलत असताना खूप अवघडल्यासारखे जाणवत होते हे प्रेक्षकांच्या सहज लक्षात आले होते.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा बॉलिवूड चित्रपट दिवाळी निमित्त ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित केला जात आहे. हिंदी प्रेक्षकां सोबत मराठी प्रेक्षक देखील या चित्रपटाला मिळावेत या हेतूने त्यांनी झी मराठी पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, अजय देवगण यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत तर जॅकी श्रॉफ, निकीतीन धीर, अनुपम खेर, जावेद जाफरी, गुलशन ग्रोव्हर यासारखी भली मोठी स्टार कास्ट देखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नूस सजावाल, फरहाद सामजी, संचित बेंद्रे आणि विधी घोडगडकर यांच्या स्क्रिप्टवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. मध्यंतरी कतरीना विकी कौशल सोबत विवाह करणार असल्याची चर्चा रंगली होती पण सलमान लग्न केव्हा करणार हा प्रश्न बहुतेक कायम अनुत्तरीतच राहील असे वाटते…