प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे बॉलिवूडमध्ये पौराणिक चित्रपटांना जास्त पसंती मिळत आहे. ओम राऊत यांचा आदिपुरुष, एस एस राजमौली यांचा आरआरआर नुकतेच प्रदर्शित झाले. चित्रपट दिग्दर्शक अलौकिक देसाई सीताच्या जीवनपटावरील रामायणवर आधारित चित्रपट निर्मितीत व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव सीता द इनकारनेशन असे असणार आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी रुपेरी पडद्यावर हा सर्वात मोठा महत्वाकांक्षी चित्रपट असल्याची जोरदार चर्चा आहे. बाहुबली इतकाच भव्य दिव्य चित्रपट बनविला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती दिली जात आहे, याचे कारण असे की बाहुबली चित्रपटाची पटकथा लीलया पेलणारे के व्ही विजयेंद्र प्रसाद यांनाच हि संधी मिळाली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून चित्रपटातील डायलॉग आणि लिरिक्स मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. तर सलोनी शर्मा आणि अंशिता देसाई चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत तसेच विविध देशांमध्येही एकाचवेळी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि दीपिका पादुकोण यांची नावे मुख्य भूमिकेसाठी व्हायरल झाली होती परंतु या सर्व अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण आता या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत काम करणार असल्याचं कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले होते. तर अभिनेता रणवीर सिंग चित्रपटात लंकेश्वर रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. कदाचित सैफ अली खान देखील एखाद्या महत्वाच्या भूमिकेत असेल अशी जोरदार चर्चा सुरु आहे. सुरुवातीला करीनाला या रोलसाठी ऑफर आली होती अशा न्यूज प्रसार माध्यमांतून व्हायरल झाल्या होत्या, सीताच्या भूमिकेसाठी तब्बल १२ कोटी रुपयांची मागणी तिने केली यावरून करीनाला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.
तसेच दीपिकाला देखील चित्रपटासाठी विचारण्यात आले अशी अफवा होती, मात्र मनोज यांनी या सगळ्या अफवा असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे, तसेच या भूमिकेसाठी सुंदर तरुण अभिनेत्रीचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंहने भूमिकेच्या खोलवर जाऊन माहिती गोळा केली, इतिहासातील दडपशाही, नरसंहार आणि सामूहिक हत्याकांडाचा अभ्यास त्याने केला. एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी जे वाचत होतो तो संपूर्ण इतिहासात जुलमी शासकांचे जीवन होते आणि त्यांनी जे काही केले ते मला स्वतःला पटवून द्यावे लागले की जगात असेही क्रूर लोक होऊन गेले. अशा भूमिका करणे म्हणजे सशाच्या बिळात जाण्यासारखे आहेत ज्यात आपले पुढील अभिनय भविष्य काय असेल ते कोणालाही सांगता येणे शक्य नाही.” पण तो करू शकलेल्या सर्व संशोधनानंतर आणि त्याच्या रंगमंचाच्या अनुभवामुळे तो ही निगेटिव्ह भूमिकेला सहज साकारू शकला. रावणाची व्यक्तिरेखा साकारणे हे देखील मोठे आव्हान त्याच्या समोर असणार आहे, तो या अष्टपैलू भूमिकेला योग्य न्याय देईल अशी आशा करूया.