मराठी चित्रपट सृष्टीत अनेक प्रसिद्ध चित्रपट होऊन गेलेत पण मागील काही वर्षांपूर्वी आलेला सैराट चित्रपट याने १०० करोडची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने एवढी मोठी कमाई केली. या चित्रपटातील सर्वच कलाकार एका रात्रीत प्रसिद्ध झाले, यातील स्टोरी प्रेक्षकांना फार आवडली तसेच या चित्रपटातील गाणी खूपच सुंदर आहेत. यातील सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले गेले, सैराट प्रदर्शित होऊन जवळपास पाच वर्षे लोटली पण अजूनही लोक नव्याने हा चित्रपट पाहतात.
यातील सर्वात महत्त्वाची पात्र म्हणजे आर्ची आणि परशा हे होते. परशा म्हणून प्रसिद्ध झालेला आकाश ठोसर आणि आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरू या दोघांनी मिळून इतका सुंदर अभिनय केला आहे की चित्रपटातील मूखु आकर्षण झाले.. फिल्म इंडस्ट्रीत हे दोन चेहरे त्यावेळी नवीनच होते त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या अफलातून अभिनयावर चकित झाला. या दोन प्रसिद्ध आणि उत्कृष्ट कलाकारांपैकी आज आपण रिंकू राजगुरू हिची चर्चा करणार आहोत. रिंकू ही आता सर्वत्र आर्ची या नावानेच जास्त ओळखली जाते.
आर्ची या नावानेच प्रसिद्ध असली तरी फिल्म इंडस्ट्रीत तीला रिंकू नावाने ओळखले जाते पण तीचे खरे नाव ”प्रेरणा महादेव राजगुरू” असे आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. सैराटच्या घवघवीत यशानंतर रिंकूने अजिबात वळून पाहिले नाही. तीने कागर, मेकअप हे चित्रपट देखील केले पण ते सैराट इतके बॉक्स ऑफिसवर गाजले नाहीत. यानंतर तीने हंड्रेड या वेबसिरीज मध्ये लारा दत्ता सोबत कामही केले , यातील नेत्रा पाटीलची तीची भूमिका ऑनलाईन जगतात लोकप्रिय झाली. याशिवाय ती अनपोज्ड या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हिंदी चित्रपटात सुद्धा दिसली आहे . या चित्रपटातील पाच लघुपटांपैकी ती रॅट-ए-टॅट मध्ये तिला संधी मिळाली. रिंकू आता पुन्हा एकदा नागराज मंजुळे दिग्दर्शित करत असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार असून ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. तसेच मराठी चित्रपट छुमंतर या मध्येही झळकणार आहे. तसेच रिंकू ने मुंबई मध्ये जस्टीस डिलीवर्ड या सिरीजचे शूटिंग सुरू केले होते.
रिंकूने खूप कमी वेळात यशाचे शिखर गाठले आहे, तीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. सैराटमध्ये काम करायच्या आधी तीने अभिनयाचा विचारही केला न्हवता पण या चित्रपटात आल्यानंतर तीने पहिल्याच प्रयत्नात यशाला मुठीत घेतले आणि याच क्षेत्रात तीने करिअर ची सुरुवात केली. तीच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तीला अशीच प्रगती मिळत जाओ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये तीची गणना होवो ही सदिच्छा. मित्रहो प्रेरणा महादेव राजगुरूचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.