Breaking News
Home / जरा हटके / लग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…
akshaya naik latika jahagirdar
akshaya naik latika jahagirdar

लग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

मित्रहो, कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात कधीच नसतो, त्याच्या आवडीनिवडी, सवयी या बऱ्यापैकी विरुद्ध असतात. पण अभिनयाचा पडदा प्रत्येक कलाकाराला भूमिकेनुसार दाखवतो त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील लुक ची सवय होऊन जाते. झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रेक्षक खूप आवडीने आणि मनापासून या मालिका पाहतात. मालिकेतील भूमिका निभावणारे कलाकार हे उच्चतम अभिनय करीत आहेत, त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान मिळवले  आहे.

झी मराठी वरील सगळ्या प्रसिद्ध मालिकांमध्ये गणली जाणारी मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली . या मालिकेने कित्येक रसिकांना आपलेसे केले आहे. यातील प्रत्येक पात्र हे उत्कृष्ट असून त्यांच्या भूमिका देखील कौतुकास्पद आहे. रुपापेक्षा महत्वाचे असते माणसाचे गुण, विचार, स्वभाव आणि त्यानेच तर आपली प्रतिमा सर्वत्र खुलते. असा विचार प्रत्येक मनात भरवणारी ही मालिका असून यातील मुख्य अभिनेत्री अक्षया हिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मालिकेत अक्षया खूप साधी, शांत दाखवली आहे पण खऱ्या आयुष्यात ती खूप सुंदर आणि धाडसी वृत्तीची आहे. अक्षया नाईक ही आपल्या अभिनयाने इतकी लोकप्रिय झाली आहे की घराघरात तिचीच चर्चा सुरू असते. या मालिकेतील लतिका अभिमन्यू जहागीरदारची भूमिका प्रचंड गाजत आहे, फार कमी वेळात तीने यशाचे शिखर गाठले आहे.

gorgeous latika akshaya naik
gorgeous latika akshaya naik

अक्षया जितका सुंदर अभिनय करते तितकीच ती दिसायलाही सुंदर आहे. इन्स्टाग्राम अकाउंट वर ती नेहमी तीचे फोटो पोस्ट करत असते. नवनवीन पोज मध्ये ती आपले फोटो पोस्ट करते, त्यातील तीचा बोल्ड लुक पाहून अनेक जण तिच्यावर फिदा होतात. अक्षयाचे हे सुंदर फोटो पाहून तीला छान छान कमेंट देखील येत असतात. अक्षया नाईक ही सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून खूप प्रसिद्ध झाली आहे, या मालिकेत ती खूपच साधी भोळी मुलगी आहे तसेच ती खूप प्रेमळ सुद्धा आहे. ती एक उत्तम मित्र आहे, उत्तम बहीण आणि मुलगी आहे. पण तीला आयुष्यात लग्नासाठी खूपसे नकार आले आहेत. मालिकेतील हिरो अभिमन्यू हा व्यायाम प्रेमी असल्यामुळे त्याला लठ्ठ माणसे आवडत नसतात. मालिकेचे कथानक खूप वेगळे असल्याने सीरिअल प्रेक्षकांची खूपच आवडती आहे.

bold and beautiful actress akshaya naik sundara manamadhye bharli
bold and beautiful actress akshaya naik sundara manamadhye bharli

कलर्स मराठीकडून अक्षया नाईकला आणि समीर परांजपे या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अक्षया ही लोकप्रिय अभिनेत्री आहे तसेच तीच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर १ लाख ५१ हजार इतके फॉलोअर्स आहेत. ती आपल्या अभिनयाच्या जोरावर असंख्य मनावर अधिराज्य करत आहे. अक्षयाला अशीच यशाची पायरी मिळत जावो, तीची आणखीन प्रगती होवो ही सदिच्छा. मित्रहो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.