मित्रहो, बॉलीवूड मधील खूपशा अभिनेत्री, अभिनेते यांचे सहकारी सुपरस्टार चाहते असतात.. त्यातील काही जण त्याच क्षेत्रातील जोडीदार निवडतात तर काही जण वेगवेगळ्या क्षेत्रातील जोडीदार. काही जण या चंदेरी दुनियेतीलच एखाद्या तारकेवर फिदा होतात आणि मग तिथून सुरू होते त्यांची लव्हस्टोरी. अगदी चित्रपटाला शोभेल अशी काहींची लव्हस्टोरी असते, जी ऐकून त्यांचे चाहते देखील थक्क होऊन जातात.. काहींची लव्हस्टोरी खूप मजेशीर असते तर काहींच्या लव्हस्टोरी मध्ये दुःखद अंतही असतो. चित्रपटा व्यतिरिक्त बॉलिवूड मध्ये जे काही घडते ते खऱ्या जीवनावर आधारित असते पण तरीही ते लोकांना आश्चर्यकारक वाटते. सारे कलाकार भूमिकाच साकारत आहेत असे भासते पण त्या प्रेमकथा सत्य असतात.
अशीच एक खऱ्या लव्हस्टोरी आपल्या गोविंदाच्या आयुष्यामध्ये घडली होती.. डान्सिंग सुपरस्टार गोविंदाला कोण ओळखत नाही! घराघरात पोहोचलेला, या चंदेरी दुनियेतील चमकता तारा. हल्ली जरी त्याचे चित्रपट प्रदर्शित होत नसले तरीही एकेकाळी त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल शो ने धमाल उडवून टाकली होती. त्या धमालित त्याच्या जोडीला असायची सुपरस्टार अभिनेत्री नीलम. गोविंदा आणि नीलम या जोडीने मिळून १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले . अर्थातच चित्रपटातील दोघांचा अभिनय आणि फेमस गाण्यांमुळे त्यांची जोडी चाहत्यांना फार आवडत होती आणि त्यांची तरुण जोडी छानच दिसायची, दोघेही एकमेकांना खूप शोभून दिसायचे.
एका मुलाखतीत गोविंदाने आपल्या लव्हस्टोरी बाबत खुलासा केला होता, त्याने त्याची आणि नीलमची पहिली भेट पन्नालाल मेहता यांच्या ऑफिसमध्ये झाली होती असे सांगितले, त्यावेळी नीलम ने पांढऱ्या रंगाचे शॉर्टस घातले होते आणि ती त्याला पहिल्याच भेटीत आवडली होती. तेव्हा निलमने त्याला हॅलो म्हटले पण त्याचे इंग्रजी जास्त चांगले नसल्याने तो तिच्याशी बोलताना लाजायचा. त्यावेळी त्याच्याजवळ सगळं काही होते, अभिनय जगतातील तो एक स्टार होता पण तरीही सुरुवातीला तिच्याशी बोलताना तो स्वतःला राखून ठेवायचा आणि आपण का लाजतोय असा स्वतःलाच विचारायचा.हळूहळू चित्रपटांमध्ये एकत्र काम करत गेल्याने त्यांची ओळख खूप वाढत गेली, त्यांच्या गाठी भेटीही वाढल्या होत्या . त्यांची मैत्री पक्की झाली होती आणि बघता बघता या मैत्रीचे रूपांतर नकळतच प्रेमात झाले.
ते दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. गोविंदा या नवीन नात्यात इतका गुंतला होता कि त्याला निलमशी लग्न करायची इच्छा होती पण हे सगळं सत्यात उतरण्या अगोदरच अघटित घडले. नवीन संसाराच्या स्वप्नात रंगलेले असताना या दोघांच्या आयुष्यात नियतीने वेगळेच वाढून ठेवले होते, त्यांना ते उलगडण्या अगोदरच गोविंदाचा साखरपुडा सुनीता सोबत झाला. गोविंदा नीलमला मनापासून विसरू शकला नाही, निलमच्या प्रेमात गुंतलेला गोविंदा घरी देखील तिच्याबद्दलच गप्पा मारायचा. शिवाय सुनीतालाही नीलम सारखी रहा तिच्याकडून काही तरी शिकून घे असं सतत म्हणायचा, पण या सगळ्याचा एके दिवशी सुनीताला राग आला आणि तीने निलमविषयी काही तरी अपशब्द बोलले. हे गोविंदाला अजिबात सहन झाले नाही आणि त्याने एका क्षणात आपला झालेला साखरपुडा मोडून टाकला.साखरपुडा मोडल्यानंतर गोविंदाने निलमशीच लग्न करण्याचा निश्चय केला होता, त्याच्या वडिलांची देखील या नवीन नात्याला संमती दिली होती. त्यांना निलमचा स्वभाव आणि सिनेमात काम करणारी देखणी सून खूप आवडायची; पण या लग्नाला गोविंदाच्या आईने साफ नकार दिला.
घरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी सुनीताला लग्नाचे वचन दिल्यामुळे तुझे लग्न निलमशी होऊ शकणार नाही असे त्याच्या आईने त्याला स्पष्ट सांगितले, गोविंदाला असे करणे थोडे जड जात होते, मनाविरुद्ध घडत आहे हे कळून देखील फक्त आई वडिलांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी तो निलमशी जाणून बुजून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या आईच्या शब्दाला मान राखत मनापासून केलेल्या प्रेमाला आयुष्यातुन नाईलाजास्तव पण आनंदाने कायमचे बाजूला केले. नीलमला देखील त्याचे हे वागणे सुरुवातीला जड गेले, पण शेवटी तिलाही ह्या गोष्टी तिऱ्हाईताकडून समजल्या. शेवटी सुनीता सोबत गोविंदाचा विवाह संपन्न झाला आणि गोविंदा आणि नीलमच्या लव्हस्टोरीला पूर्णविराम मिळला.
आज त्यांच्या लग्नाला बरेच दशके ओलांडली आहेत, तरी देखील गोविंदा म्हणतो.. आजही निलमला पाहताच त्याच्या हृदयाचे ठोके जोरात धडधड करू लागतात. गोविंदा आणि नीलमची ही अनोखी प्रेमकहाणी छान वाटते पण त्यांनी लग्न करायला हवे होते असे फिल्म इंडस्ट्री मधील कलाकार मित्र मंडळी आणि चाहत्यांना मनापासून वाटत होते. सुनीता सोबत लग्न करून गोविंदाने आदर्श संदेश दिला, आई वडील जे सांगतात, करतात ते मुलांच्या भविष्याचा विचार करूनच. म्हणून तरुण तरुणींनी आपल्या क्षणिक प्रेमासाठी जन्मापासून सोबत असणाऱ्या आई वडीलांना विसरू नये. मित्रहो आजचा हा जरा हटके लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा, तसेच आवडला तर लाईक आणि मित्र मंडळींना वाचण्यासाठी शेअर करायला विसरू नका.