मित्रहो टेलिव्हिजन वर बरेच शो चालू असतात, आपण नेहमी पाहत असतो आणि आपली आवड दिवसेंदिवस वाढतच जाते. मग त्यातील कलाकार देखील आपल्या ओळखीचे बनतात. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो, पण आता लोकडाऊन मुळे सर्व मालिकेचे चित्रीकरण ठप्प आहे. त्यामुळे आपले कलाकार हे आपल्याशी दुरावले आहेत. याचे दुःख जेवढं रसिकांना आहे तेवढंच कलाकारांना देखील आहे. पण हा काळ खूप गंभीर आहे, माणसाचा जीव धोक्यात आहे. अशा काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. कामाची गरज प्रत्येकाला आहे, रसिकांना कलाकारांची गरज आहे, कलाकारांना चित्रिकरणाची गरज आहे.
पूर्ण जग जिथल्या तिथे थांबले आहे आणि याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे तसाच काहीसा गंभीर परिणाम कलाक्षेत्रावर सुद्धा झाला आहे. काही कलाकारांना तर जेवणाचे वांदे होत आहेत आणि याची व्यथा आपल्या नट्टू काकांनी मांडली आहे. आपण सर्वजण “तारक मेहता…” मधील जेठालालच्या दुकानातील नट्टू काकांना ओळखतो. ही मालिका गेली १२ प्रेक्षकांना हसवत आली आहे. यातील सर्व पात्र अतरंगी आहेत. प्रत्येक जण खूप वेगळा वाटतो. कोणी पंजाबी आहे तर कोणी गुजराती आहे तर कोणी मराठी आहे आणि कोणी तेलगु आहे . खूप जण येथे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे आहे पण तरीही एकत्र राहून त्यांनी समाजाला एक आदर्श दिला आहे.यातील जेठालाल, दयाबेन , टप्पू सेना, भिडे मास्तर, हत्ती भाई, पोपटलाल, बाघा, बापूजी, तसेच आणखी खूप जण आहेत ज्यांनी आपल्या विनोदी अभिनयातून या मालिकेला शिखरावर पोहचवले आहे. पूर्ण देश या मालिकेच्या प्रेमात पडला आहे. प्रत्येक वेळी अनेक संकटे असूनही आयुष्य मजेने कसे जगता येईल हे या मालिकेतून स्पष्ट कळते. एखादा विषय कसा लांबणीवर टाकायचा आणि तोच विषय पुन्हा पुन्हा रंगवून हसवून प्रेक्षकांना दाखवायचा हे या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. यातील प्रत्येक कलाकार हा अगदी उत्कृष्ट आहे. त्यात आपले नट्टू काकाही गणले जातात.
नट्टू काका या मालिकेचा एक महत्वाचा भाग आहेत. जेठालाल च्या दुकानात ते जेठालाल चा व्यवसाय सांभाळतात, त्यांच्याबरोबर बाघा देखील असतो. ते दोघेही खूप छान अभिनय करतात. त्या दोघांसह जेव्हा जेठालाल असतो तेव्हा त्या तिघांची केमिस्ट्री एक वेगळीच छाप पाडून जाते. त्यांच्या अभिनयाने हास्याचे नुसते फवारे उडू लागतात. नट्टू काका हे खूप छान हावभाव प्रदर्शित करतात. त्यांच्या चेहऱ्यावरूनच अभिनयाची कला उमटली जाते. गेली १२ वर्षे या मालिकेद्वारे आपणास हसवून नट्टू काका आपले आयुष्य वाढवत आहेत. नट्टू काकांचे खरे नाव घनश्याम नायक असे आहे आणि आता ते ७६ वर्षाचे आहेत. लोकडाऊनमुळे चित्रीकरण बंद आहे, पण बाहेरील भागात जाऊन मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करत आहेत. पण यामुळे कलाकारांचे खूप हाल होत आहेत.
नट्टू काकांनी आपली व्यथा सर्वांसमोर मांडली. त्यांनी असे सांगितले की “मी गेल्या १ महिन्यापासून घरीच आहे. चित्रीकरण करण्यासाठी माझा अजून नंबर आलेला नाही पण आता मला घरी राहण्याचा खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे या चिंतेने मला एक वेळचे जेवण देखील जात नाहीये. मालिकेचे निर्माते मला लवकरच चित्रीकरणासाठी बोलवतील अशी अपेक्षा आहे पण तरीही घरचे सदस्य मला बाहेर जाऊन शूटिंग न करण्याचा दबाव टाकत आहेत. बाहेर गेल्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे मला आता जेवण देखील जात नाही.” नट्टू काकांची परिस्थिती ही अनेक कलाकारांची आहे, अभिनय हीच कलाकाराची दुनिया असते ,त्यामुळे काही काळ त्याच्यापासून दूर राहिल्याने कलाकार कंटाळून जातो. पण ही वेळही निघून जाईल आपण धीर ठेवणे आवश्यक आहे. मित्रहो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.