Breaking News
Home / मराठी तडका / आई मला म्हणते की तू या इंडस्ट्रीसाठी खूपच साधा आहे.. कलाकार समोरासमोर येतात तेव्हा खोटेपणा चेहऱ्यावर दिसतो
pushkar jog marathi actor
pushkar jog marathi actor

आई मला म्हणते की तू या इंडस्ट्रीसाठी खूपच साधा आहे.. कलाकार समोरासमोर येतात तेव्हा खोटेपणा चेहऱ्यावर दिसतो

अभिनेता पुष्कर जोग हा बालपणापासूनच चित्रपटातून काम करतो आहे. महेश कोठारे यांच्या जबरदस्त चित्रपटातून तो पहिल्यांदा नायकाच्या भूमिकेत झळकला होता. मराठी बिग बॉसच्या घरात असताना सई लोकूर सोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. पण या गोष्टी मी सिरियसली घेतल्या नाहीत असे नुकत्याच एका मुलाखतीत तो सांगताना दिसला आहे. या ट्रोलिंगचा कुठेतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असतो.

pushkar jog
pushkar jog

पण ते ट्रोलिंग फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित असावं, त्यात तुमच्या कुटुंबाला आणू नये असे त्याचे प्रामाणिक मत आहे. पुष्करने आपल्या कारकिर्दीत यश अपयशाच्या दोन्ही गोष्टी पचवल्या आहेत. चित्रपटामध्ये पैसे गुंतवल्याने त्याला आर्थिक फटकाही बसला होता. या इंडस्ट्रीतील लोकांसोबत काम करताना पुष्करला वाईट अनुभव देखील आले त्यामुळे तुम्ही किती खोटे आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसते असे तो म्हणतो. इंडस्ट्रीत त्याची फारशी कोणाशी मैत्री झाली नाही. याचे कारण सांगताना तो म्हणतो की, मी ड्रिंक वगैरे करत नाही त्यामुळे मी फारसा पार्टी, इव्हेंटमध्ये जात नाही. रेड कार्पेटवर जेव्हा तुम्ही कोणाच्या समोर जाता तेव्हा मी अभिनेता आहे, तो देखील अभिनेता असल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणा मला लगेच ओळखता येतो.

pushkar jog kushal badrike friendship
pushkar jog kushal badrike friendship

मराठी इंडस्ट्रीत सिद्धार्थ जाधव आणि कुशल बद्रिके हे दोघेच माझे खूप चांगले मित्र झाले आहेत. त्या दोघांशी मी मनातलं सगळं शेअर करू शकतो. माझ्या कठीण काळात त्या दोघांनी मला साथ दिली आहे. पण त्याच जोडीला माझ्या सहनायिका माझ्या मैत्रिणी झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी माझी आईच मला सांगत होती की तू खूपच साधा आहे या इंडस्ट्रीसाठी. पुष्करने त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे याबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणतो की, माझी पत्नी आणि मी दोघेही माझ्या मुलीला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. ती एका वेगळ्या क्षेत्रात काम करते मीही माझ्या कामात व्यस्त असतो. तीला सोशल मीडियाचा कंटाळा आला म्हणून तिने त्याच्यापासून लक्ष बाजूला केले आहे. आमची मुलगी हेच आमचं पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे पत्नीला अनफॉलो करण्याचं काहीच कारण नाही.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.