Breaking News
Home / जरा हटके / स्वतःच्या स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत आहेत.. महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक यांची नावं घेत दिग्दर्शकाचा आरोप
prasad oak kedar shinde mahesh kothare
prasad oak kedar shinde mahesh kothare

स्वतःच्या स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत आहेत.. महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक यांची नावं घेत दिग्दर्शकाचा आरोप

नवीन दिग्दर्शकाच्या कामात अडथळा निर्माण करणे, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांशी संबंध तोडणे अशी कामं मराठी इंडस्ट्रीतील काही नावाजलेले दिग्दर्शक करत आहेत. असा थेट आरोप दिग्दर्शक निखिल नानगुडे यांनी लावला आहे. महत्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या काही दिग्दर्शकांची त्यांनी थेट नावे देखील घेतली आहेत. निखिल नानगुडे हे दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माता म्हणून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. शिवरुद्र निर्मिती या निर्मिती संस्थेतून त्यांनी वलय, मनुष्यगण अशा वेबसिरीज आणि लघुपट बनवले आहेत.

nikhil nangude
nikhil nangude

त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः निखिल नानगुडे यांनीच केलेले आहे. मनभेद या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केलेले आहे. पण एवढे असूनही आपल्या या इंडस्ट्रीत पुढे येण्यासाठी सहकार्य मिळत नाही असा आरोप त्यांनी काही दिग्दर्शकांवर लावला आहे. एक इन्स्टाग्राम पोस्ट करत निखिल नानगुडे यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक अशी फिल्म इंडस्ट्रीमधील माणसे नवोदितांच्या कामात बाधा आणत आहेत का, अडथळे निर्माण करत आहेत का? नवीन लेखक, दिग्दर्शक वा इतर लोकांसोबत जी नवीन माणसे जोडली जात आहेत त्यांना ही आपल्या स्वार्थासाठी तोडत आहेत का? हा एक मोठा प्रश्न, शंका आमच्या बऱ्याच फिल्म मिटींग्स कॅन्सल झाल्याने वा करण्यात आल्याने, वा लांबणीवर गेल्याने उपस्थित होत आहे. हे नक्की!

kedar shinde and prasad oak family
kedar shinde and prasad oak family

अशा जुन्या फिल्मइंडस्ट्रीमधील लोकांच्या कामाचं आपण भविष्यात समर्थन का करावं? असा थेट आरोपच त्यांनी लावला आहे. महेश कोठारे, केदार शिंदे आणि प्रसाद ओक यांची मराठी इंडस्ट्रीत मक्तेदारी सुरू आहे आणि नवख्या दिग्दर्शकांना ते संधी देत नाहीत असे नानगुडे यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वतः असे अनुभव घेतल्याने हा प्रश्न त्यांनी सोशल मिडियावरच उपस्थित केला आहे. फिल्म मिटींग्स कॅन्सल होणे किंवा त्या लांबणीवर पडण्यामागे यांचा हात आहे का अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.