Breaking News
Home / जरा हटके / गेले दोन तीन महिने अविरत.. शिवानीचा वाढदिवस अन सासूबाईंची खास पोस्ट
shivani rangole mrinal kulkarni
shivani rangole mrinal kulkarni

गेले दोन तीन महिने अविरत.. शिवानीचा वाढदिवस अन सासूबाईंची खास पोस्ट

मालिकांमध्ये काम करत असताना बऱ्याचदा कलाकारांना बाहेरगावी राहावं लागतं. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोल्हापूरमध्ये शूट होत आहे. त्यामुळे या मालिकेचे कलाकार आपले घर सोडून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. पण सुट्टी मिळाली की लगेचच या कलाकारांना घराची ओढ लागलेली असते. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नापासून ही मालिका प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे.

shivani rangole birthday special
shivani rangole birthday special

शिवानी रांगोळे, ऋषीकेश शेलार आणि कविता लाड यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक या मालिकेकडे आपोआप वळली आहेत. आज शिवानी रांगोळे हिचा वाढदिवस आहे, पण वाढदिवसाच्या दिवशीही ती कोल्हापूर येथे शूट करत आहे. त्यामुळे शिवानीच्या सासूबाई  म्हणजेच मृणाल कुलकर्णी तिला खूप मिस करत आहेत. सून म्हणून नाही तर शिवानी या घरातलीच एक मुलगी आहे अशी प्रतिक्रिया ते तिच्याबाबतीत देत असतात. शिवानी आणि विराजसचे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच शिवानीला ही मालिका मिळाली होती. त्यामुळे तिचा खूप कमी सहवास त्यांना लाभत आहे आणि म्हणूनच त्यांना तिचे लाड करायलाही मिळत नाहीयेत.

virajas kulkarni shivani rangole
virajas kulkarni shivani rangole

आज शिवानीचा वाढदिवस यानिमित्ताने मृणाल कुलकर्णी यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात की, सूनबाई, कम सून! प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! गेले २, ३ महिने अविरत कष्ट करते आहेस. तेही हसतमुखाने, न दमता, न कंटाळता ! “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे, अभिमान आहे! अशीच यशस्वी हो, तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ देत! आनंदी रहा, खूप खूप प्रेम! पुढे त्या असेही म्हणतात की, पण सून come soon g! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.