Breaking News
Home / मराठी तडका / आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा.. फोटो शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव
gauri kulkarni engagement
gauri kulkarni engagement

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा.. फोटो शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरून गौरीने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले आहे. गौरीने बोटातली साखरपुड्याची अंगठी दाखवून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सेलिब्रिटींनी सुद्धा गौरीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. गौरी कुलकर्णी ही आई कुठे काय करते या मालिकेतून गौरीचीच भूमिका साकारत होती. या मालिकेनंतर ती सन मराठीवरील प्रेमास रंग यावे या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत होती.

gauri kulkarni
gauri kulkarni

गौरीने आई कुठे काय करते मालिकेतून ब्रेक घेतला होता. अर्थात यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी सर्वांची इच्छा असतानाही गौरी परदेशात गेली. त्यानंतर मालिकेत यशच्या आयुष्याला धक्कादायक वळण आलेले पाहायला मिळाले होते. पण दुसऱ्या मालिकेच्या प्रोजेक्टमुळे आई कुठे काय करते मालिकेत हा मोठा ट्विस्ट आणावा लागला होता. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली होती. गौरी कुलकर्णी हिने साखरपुडा तर केला पण तिने कोणासोबत आयुष्याची लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला हे अजूनही जाहीर केलेले नाही. त्यामुळे गौरी कोणासोबत लग्न करतीये याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. लवकरच तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जाहीर करावे अशा कमेंट्स तिला त्या खास फोटोवर मिळत आहेत.

actress gauri kulkarni
actress gauri kulkarni

गौरी कुलकर्णीला अभिनयाची आवड होती. त्यामुळे ती विविध मालिकेसाठी ऑडिशन देत होती. अशातच आई कुठे काय करते मालिकेत तिला गौरीची भूमिका मिळाली. आई कुठे काय करते मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. शब्दांच्या पलीकडले या कवितांच्या मैफिलीत गौरीने कवितांचे सादरीकरण केले होते. संदेश पवार याने तिला साथ दिली होती. प्रेमास रंग यावे या आणखी एका मालिकेमुळे गौरी छोट्या पडद्यावरून लोकप्रियता मिळवत आहे. त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतही चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आता गौरी त्याचे नाव कधी जाहीर करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तूर्तास साखरपुड्यानिमित्त गौरी कुलकर्णीचे विशेष अभिनंदन.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.