मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे तर नुकतेच शिवानीचे केळवण देखील साजरे झालेले पाहायला मिळाले होते. काल १ मे रोजी शिवानी आणि विराजस यांच्या लग्नाचा मेहेंदी सोहळा पार पडला यावेळी दोघांनी हिरव्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केलेला पाहायला मिळाला.
शिवानीने ‘VIRYA’ असे विराजसचे नाव आपल्या हातावर मेहेंदीने सजवलेले पाहायला मिळाले. मेहेंदीने सजलेले काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोघांच्या लग्नाला अजून सहा दिवस बाकी आहेत मात्र या सहा दिवसात ग्रहमख पूजन, हळद आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. इकडे मृणाल कुलकर्णी देखील आपल्या होणाऱ्या सुनेच्या आगमनाच्या जोरदार तयारीत आहेत. लग्नाअगोदरच दोघी भावी सासू सुनेने फोटो सेशन केले होते. त्यावरून अनेकांनी या दोघीना चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा मीडियाशी बोलून दाखवल्या आहेत, या ऑनलाइन मुलाखतीत विराजस देखील सहभागी झालेला दिसून आला.
सुरुवातीला गमतीगमतीत मृणाल कुलकर्णी म्हणतात की, “माझ्या सुनेने तांदूळ निवडून दाखवावेत. ती नीट बोलते की नाही यासाठी तिने गाऊन दाखवावे. तिने चालून दाखवावे.” या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मृणाल कुलकर्णी अचानकपणे मनसोक्त हसून लागल्या आणि पुन्हा एकदा म्हणाल्या की. “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.”