झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात जास्त स्टार कास्ट लाभलेली मालिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धतीने सजलेलं घर पाहायला मिळालं. त्यामुळे मालिकेचं मोठं कौतुक करत वाहिनीच्या प्रेक्षकांनी स्वागतच केलं होतं. सिद्धार्थ, आदिती, नाना, नानी, ताई काकी, रत्नाक्का, मोठी आई, दुमन्या, बापू काका, नमा, युवराज, बयो आज्जी, महालक्ष्मी अशी बरीचशी पात्र रंगलेली पाहायला मिळाली. ३० ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झालेली ही मालिका जवळपास वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. यातील बरीचशी पात्र साकारणारी कलाकार मंडळी बदलण्यात आली.

परंतु विविध पात्रांमुळे मालिकेला फारसा फरक पडला नाही. आता लवकरच या मालिकेचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज या मालिकेचे शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे भावुक होऊन कलाकारांनी एकमेकांना आणि प्रेक्षकांना देखील निरोप दिला आहे. मालिकेतील रमाक्का म्हणजेच अपर्णा क्षेमकल्यानी या डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळाल्या. आज या मालिकेचा शेवटचा दिवस असे म्हणत भावुक होऊन त्यांनी साकारलेल्या रमाक्काला निरोप दिला आहे. शूटिंगचा शेवटचा दिवस, प्रिय रत्नाक्का आज तुझा निरोप घेतेय. तुझ्या आयुष्यातील सगळे ऋतू मला अनुभवू दिलेस. तुझा प्रेमळपणा, त्रागा, चिडचिड, आई होण्याची आसोशी, मिष्कीलता. तुझं हळूहळू गाडी चालवणं, सगळं कायम आठवणीत राहीन.

तुझ्या निमित्ताने लोकं प्रत्यक्ष भेटून, फोन करून त्यांच्या आत्याची आठवण काढत असत. त्या सगळ्या खऱ्या आयुष्यातील रत्नाक्कांना त्यांच्या जीवनात भरभरून सुख लाभो आणि काय हवं. मालिकेच्या सर्व कलाकारांनी एकमेकांना तात्पुरता निरोप दिला असला तरी ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आहे. यापुढे ही कलाकार मंडळी वेगवेगळ्या मालिकेतून समोर येत राहोत हीच त्यांना सदिच्छा. येत्या ८ ऑगस्ट पासून या मालिकेच्या जागी नवा गाडी नवं राज्य ही नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेत मोठ्या पडद्यावरची नायिका पल्लवी पाटील छोटा पडदा गाजवताना दिसणार आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर हे रिअल लाईफ कपल निर्मितीची धुरा सांभाळणार असल्याने या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.