बिग बॉसचा शो राडा, भांडणं, वाद या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहिलेला दिसतो. नुकताच हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉसचा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही शोची करेंज सामान्य प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करताना दिसली आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या चौथ्या सिजनमध्ये देखील चित्रपट मालिका क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या सोळा जणांमधून चार सदस्यांची निरुपयोगी सदस्य म्हणून निवड केली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात वादाची ठिणगी पेटली आज दुसऱ्या दिवशी देखील प्रसादचा तेजस्विनी लोणारी सोबत वाद झाला.
बिग बॉसच्या शोमध्ये कलाकारांसोबत काही रिऍलिटी शो जिंकणारे सदस्य दाखल झाले आहेत. या सदस्यांमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी मालिकेच्या सेटवर स्वतःची रिक्षाच घेऊन जाते. यामुळे या अभिनेत्रीवर तिच्या सहकलाकारांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ही मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे यशश्री मसुरकर. रेडिओ जॉकी म्हणूनही तिने काम केले आहे. यशश्रीला स्वच्छंदी जगायला आवडतं हे बिग बॉसच्या घरातही तुम्हाला अनुभवायला मिळेल. लाल ईश्क या मराठी चित्रपटातून यशश्रीने महत्वाची भूमिका निभावली होती. रंग बदलती ओढणी ही तिने साकारलेली पहिली हिंदी मालिका. चंद्रगुप्त मौर्य, संस्कार धरोहर अपनों की, दो दिल बंधे एक डोरी से, प्यार तुने क्या किया, कोड रेड, चक्रवर्ती अशोक सम्राट, हम आपके घर में रहते है, आरंभ, क्राईम पेट्रोल अशा मालिकांमधून यशश्रीला संधी मिळाली.
यशश्रीकडे स्वतःची रिक्षा आहे, ही रिक्षा घेऊन ती मालिकेच्या शूटिंगला जात असते. सुरुवातीला यशश्री रिक्षा घेऊन शूटला येते हे कळल्यावर तिच्या सहकलाकारांनी तिची खिल्ली उडवली होती. मात्र यामागचे खरे कारण तिने सांगितले होते की, मी कार विकून रिक्षा घेण्यामागे एक खास कारण होते. माझा परदेशातला एक मित्र भारतात फिरायला आला होता. प्रत्येक गल्ली बोळाच्या ठिकाणी कार घेऊन जाणे शक्य नसल्याने मी कार विकून रिक्षा खरेदी केली होती. मात्र त्यानंतर आता रिक्षाचे काय करायचे हा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. त्यावेळी शूटिंगला मी रिक्षाच घेऊन जाणे पसंत केले. यशश्री ही स्वच्छंदी मुलगी आहे. रस्त्यावरची भटकी कुत्री, मांजरी यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम आहे.
भटक्या मुक्या प्राण्यांची काळजी घेणे त्यांना खाऊ घालणे हे तिचे काम आता नित्याचेच बनले आहे. शाळेत जाणाऱ्या गरीब मुलांनाही ती आपल्या रिक्षाने इच्छित स्थळी पोहोचवते. यातून आपल्या मनासारखं जगण्याची संधी मिळत असल्याने तिने आपल्या रिक्षाला सर्वस्व मानलं आहे. टूकटुक राणी अशी ओळख बनवलेल्या यशश्रीने आपल्या रिक्षाला देखील हेच नाव दिले आहे. नुकतेच तिने आपल्या रिक्षाला रंगरंगोटी करून नवा लूक दिला आहे. रिक्षावर निळेशार पाणी आणि रंगीबिरंगी मासे आकर्षक पद्धतीने रंगविले आहेत. बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे यशश्री आता ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करणार आहे.