रसिकाने if you see the signs, you know what’s coming! Wait for it! असे कॅप्शन देऊन हातावर मेहेंदी असलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. रसिकाच्या ह्या व्हिडीओ वरून ती लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या ह्या प्रिवेडिंग फोटोशूटला तिच्या तमाम चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. मात्र रसिकाने १८ ऑक्टोबर २०२१ रोजीच आदित्य बिलागी सोबत लग्न केले असल्याचे उघड झाले आहे. तिच्या या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रसिका आज उद्या लग्नाची तारीख जाहीर करेल अशी आशा असतानाच तिने गुपचुप लग्न उरकले असल्याचे आता समोर आले आहे.
गोव्याच्या बीचवर काही मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करून त्यांनी हा विवाहसोहळा पार पाडला होता. या लग्नातील एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून लग्न झालं असल्याची बातमी चाहत्यांना कळवली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. रसिका आणि आदित्य यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू होती. काही दिवसांपूर्वी तिने ठाणे येथील शिवशाही पैठणी या प्रसिद्ध दुकानाला भेट दिली होती आणि लग्नाच्या बस्त्याची खरेदी देखील केली होती. त्यामुळे रसिका आणि आदित्य हे दोघेही लवकरच लग्न अशी चर्चा पाहायला मिळाली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिके अगोदर तिने गर्लफ्रेंड, पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. व्यावसायिक नाटक साकारत असताना रसिकाने टीव्ही वरील लक्स झकास हिरोईन कॉन्टेस्टमध्ये पार्टीसिपेट केले होते.
तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायन सोबतच त्यात कामही केले होते. त्यामुळे रसिका उत्तम गायिका देखील आहे हे प्रेक्षकांच्या समोर आले. अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असलेली रसिका आता लवकरच लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी यूएसए स्थित आदित्य बिलागी याने रसिकाला रोमँटिक डेटवर नेऊन प्रपोज केले होते. रसिकाने देखील त्याने केलेल्या प्रपोजला आपला होकार कळविला होता. आदित्य बिलागीला डेट करण्या अगोदर रसिका ही अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रेमात पडली होती. मात्र त्यांच्यात ब्रेकअप झाला आणि सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. मधल्या काळात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ब्रेक घेतल्यावर रसिका पुढील शिक्षणासाठी यूएसला दाखल झाली इथेच तिची आदित्य बिलागी सोबत मैत्री झाली आणि ही मैत्री आता लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. रसिका सुनील आणि आदित्य बिलागी ह्या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन…